Shivaji Maharaj sakal
छत्रपती संभाजीनगर

क्रांती चौकातील पुतळ्याचे अनावरण शिवरायांच्या वंशजांच्या हस्ते करावे

एमआयएम विद्यार्थी आघाडीची मागणी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण लवकरच होणार आहे. या कार्यक्रमास शिवरायांच्या वंशजांना बोलावून त्यांच्या हस्तेच अनावरण करावे, अशी मागणी शुक्रवारी (ता. २८) एमआयएम विद्यार्थी आघाडीतर्फे प्रदेशाध्यक्ष डॉ. कुणाल खरात यांनी पत्रकार परिषदेत केली.

डॉ. खरात म्हणाले, की बहुजन समाजाच्या न्याय हक्कांसाठी क्रांती चौकातून अनेक पक्ष, सामाजिक संघटनांचे मोर्चे निघाले. त्याच चौकात शिवरायांच्या अश्‍वारुढ पुतळ्याची स्थापना होणार आहे. आधीच्या पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणीही सर्व घटकांनी केली होती.

ते स्मारक आता पूर्ण होत असून उद्‍घाटन छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याहस्ते करण्यात यावे. तसेच या कार्यक्रमाला सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना निमंत्रित करावे, अशी आमची मागणी आहे. तसेच टीपू सुलतान हे इंग्रजांविरोधात लढले आणि शहीद झाले. त्यामुळे ते स्वातंत्र्यसेनानी आहेत. तसेच यासंबंधी होणारा वाद निरर्थक आहे. तो वाद मिटला पाहिजे ही आमची भूमिका असल्याचे डॉ. खरात यांनी सांगितले.

शाळा, विद्यापीठे सुरू करा

कोरोनामुळे दोन वर्षापासून शाळा, महाविद्यालये कधी चालू कधी बंद होत आहेत. त्यामुळे दर्जाची घसरण होत आहे. तो सुधारण्यासाठी ऑफलाईन शाळा, महाविद्यालये सुरु झाली पाहिजेत. विद्यार्थी जेव्हा जॉबसाठी जातात, तेव्हा त्यांना कंपन्यामध्ये पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. हे टाळायचे असेल तर, शिक्षणातील अडथळे दूर केले पाहिजेत, असे डॉ. खरात म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting : नागपूरमधील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रकल्पाला मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ६ मोठे निर्णय, वाचा...

Mumbai Local News: यंदा रेल्वे रुळावर पाणी साचणार नाही, महापालिकेचा मोठा प्लॅन तयार; नेमकी योजना काय?

लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेची वेळ बदलली, 'या' वेळेस प्रेक्षकांच्या भेटीला, कोण घेणार निरोप?

Latest Marathi News Live Update : मिरा-भाईंदरमधील वाढत्या पाणीटंचाईमुळे मनसेचे अनोखे आंदोलन

YouTube Growth Tips: यूट्यूबवर सबस्क्राईबर्स वाढवून महिन्याला लाखो कसे कमवायचे? कंपनीने स्वतःच सांगितली भन्नाट ट्रिक

SCROLL FOR NEXT