file photo 
छत्रपती संभाजीनगर

रहा फीट अँड फाईन : आयुर्वेदीक काढा ठेवेल सर्दीजन्य आजारांपासून दूर 

मधुकर कांबळे

औरंगाबाद - सध्या थैमान घातलेल्या कोरोनाची सुरूवात सर्दीजन्य आजारापासून होते. यासाठी आपल्या घरातील स्वयंपाक घरातील सुंठ, मीरे आणि लेंडीपिंपळी या त्रिकटूचा काढा सर्दी आणि सर्दीजन्य आजारांना दूर ठेवेल. रोगप्रतिकार शक्ती वाढवुन कोरोनासारख्या आजाराला आपण आपल्या कुटूंबियाला दूर ठेवु शकतो, असा सल्ला डॉ. अरविंद धाबे यांनी दिला आहे. 

डॉ. अरविंद धाबे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी अलहाबाद येथील हिंदी विश्‍वविद्यालयातुन चार वर्षाचा आयुर्वेदरत्न हा अभ्यासक्रमही पुर्ण केला आहे. आयुर्वेदीक औषधोपचार हा त्यांचा पिढीजात व्यवसाय आहे. त्यांचे वडील शंकरराव धाबे परभणी जिल्ह्यात नामांकीत वैद्य होते. त्यांचा वारसा डॉ. धाबे पुढे चालवत आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती उत्तम असणे गरजेचे आहे. सध्या कोरोनामुळे सर्दी, कोरडा खोकला, घशात खवखव होत असेल तर आयुर्वेदात यासाठी दोन चूर्ण सांगीतले आहेत. सीतोपलादी चूर्ण किंवा तालिसादी चुर्ण. हे चुर्ण तीनवेळा मधातुन चाटण घेतले तर सर्दी व सर्दीजन्य आजारांची बाधा होत नाही. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीच्या त्यांनी टिप्स दिल्या. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करा हे 

  •  गुळवेल काढा किंवा गुळवेल सत्व घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. 
  •  आवळ्यात सी व्हिटॅमिन मुबलक असतात तर बदामात खनिज मोठ्या प्रमाणात असतात. 
  • यासाठी रोज एक आवळा आणि दोन बदामाचे नियमित सेवन करावे 
  •  अश्‍वगंधाच्या मुळ्याची पावडर एक ते अर्धा चमचा दुधातून घ्यावी. 
  •  ज्येष्ठमधाची काडी चघळावी किंवा पावडरचे चाटण करावे 
  •  शिलाजीतमध्ये खनिज आहे, बाजारात कॅप्सूल स्वरुपात ते उपलब्ध असते. सकाळ-संध्याकाळ एक एक गोळी घेतली तरी रोगप्रतिकारशक्ती वाढते. 
  •  बहुगुणी तुळस कोणत्याही आजारासाठी प्रभावी आहे. अद्रक, लसूणही आहारात हवे. 
  •  वरीलपैकी काहीच शक्य नसेल तर च्यवनप्राश सकाळ-संध्याकाळ एक एक चमचा घ्यावे. 
  •  सुंठ, मीरे, लेंडीपिंपळी या त्रिकटूचे समभाग घेऊन त्यांचे गुणधर्म वाढवण्यासाठी तुळशीची पाने, जायफळ, दालचीनी, गवतीचहा मिसळून आयुर्वेदीक काढा घेतल्यास सर्दीजन्य आजारांपासून दूर राहता येईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: तापमान आणखी वाढणार; घाटमाथ्‍यावर आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता,कसे असेल हवामान? जाणून घ्या

Swachh Survekshan:आनंदाची बातमी! 'स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत' कऱ्हाड देशात अव्वल; दिल्लीत हाेणार गौरव, सलग सहाव्यांदा पुरस्कार पटकावला

Pune News: वाकडमध्ये फ्लॅटसाठी विवाहितेचा छळ; सासरच्या व्यक्तींची शिक्षा कायम

मोठी बातमी! आता विद्यार्थी अन् प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक; वर्गातच असणार बायोमेट्रिकची मशिन; परीक्षेसाठी ७५ टक्के उपस्थिती आवश्यक

Beet Sprouts Chilla: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि हटके हवाय? मग हा बीट-स्प्राऊट्स चिला एकदा ट्राय कराच!

SCROLL FOR NEXT