vaccine Stock sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : लसीच्या १५ हजारांवर डोसचा मिळाला साठा

महापालिकेने शासनाकडे कोव्हॅक्सीनच्या ७० हजार डोसची मागणी नोंदविलेली होती

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महापालिकेत कोव्हॅक्सीनच्या (Covaxin vaccine)मोजक्याच लसींचा साठा शिल्लक असताना महापालिकेला बुधवार (ता.१९) १५ हजार ३६० डोसचा साठा मिळाला. त्यामुळे पंधरा ते अठरा वयोगटातील लसीकरणाची (Vaccination) मोहीमेला फायदा होईल. महापालिकेने शासनाकडे कोव्हॅक्सीनच्या(Covaxin vaccine) ७० हजार डोसची मागणी नोंदविलेली होती.

३ जानेवारीपासून १५ ते १८ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासही शासनाने परवानगी दिल्याने या वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सीनचा डोस दिला जात आहे. मात्र, महापालिकेला सुरूवातीपासूनच कोविशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सीनचा पुरवठा कमी प्रमाणात होत आलेला आहे. आताही महापालिकेकडे कोविशिल्ड लसींचा सत्तर हजार डोसचा साठा शिल्लक आहे. परंतु कोव्हॅक्सीनचे मात्र केवळ पाच हजार डोसच शिल्लक राहिले होते. महापालिकेने काही दिवसांपूर्वी कोव्हॅक्सीनच्या ७० हजार डोसची मागणी नोंदविलेली होती. परंतु शासनाकडून कालपर्यंत त्याचा पुरवठा झाला नव्हता.

त्यामुळे पंधरा ते अठरा या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मोहीम संकटात सापडण्याची चिन्हे होती. मात्र, बुधवारी शासनाकडून महापालिकेला कोव्हॅक्सीनच्या १५ हजार ३६० डोचा पुरवठा झाला. सध्या शहरात १८ वर्षांवरील नागरिकांना प्रामुख्याने कोविशिल्ड लसच टोचली जात आहे. या लसीचे सुमारे ७० हजार डोस महापालिकेकडे उपलब्ध आहेत. तर कोव्हॅक्सीनचे आता १५ हजार डोस प्राप्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Strawberry Cultivation : आंबेगाव, खेड, जुन्नर व मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४.९६ कोटी रुपये निधी मंजूर; विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

SCROLL FOR NEXT