अनेकांचे चावे घेणाऱ्या कुत्र्याला पकडून नेताना महापालिकेचे श्‍वान पथक. 
छत्रपती संभाजीनगर

पिसाळलेल्या कुत्र्याचा धूमाकूळ अन् भर रस्त्यात नागरिकांची पळापळ!

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - रविवार हा सुटीचा दिवस. वेळ साधारणतः ११ वाजेची. गजानन महाराज मंदिर रोड ते जयभवानीनगर मार्गावर लोक निवांतपणाने खरेदी करीत होते. त्याचवेळी लोकांची पळापळ सुरू झाली. काहीजण स्वतःचा बचाव करण्यासाठी सुरक्षित जागा शोधत होते, तर काहीजण हाताने हुसकावण्याचा प्रयत्न करीत होते. या पळापळीत तो कुत्रा दिसेल त्याचे चावे घेत वेडावाकडा धावत होता. 

दहा ते पंधरा जणांना घेतले चावे 
गजानन महाराज मंदिरापासून पुंडलिकनगरमार्गे जयभवानीनगराकडे जाणारा रस्ता सतत वर्दळीचा. याच रस्त्यावर भाजीपाला खरेदी करणाऱ्यांची, दुकानांमध्ये जाणाऱ्यांची लगबग तर पेट्रोलपंपावर पेट्रोल भरायला जाणाऱ्यांची वेगळीच घाई. रविवारचा दिवस असल्याने लोक आरामात खरेदी करीत होते. साधारणतः सकाळी ११ची वेळ होती. याचवेळी गजानन महाराज मंदिराकडून एक कुत्रा धावतच सुटला. तो नुसता धावतच नव्हता, तर तो लोकांना चावे घेत सुटला होता. या रस्त्यावरून जाताना पुंडलिकनगर, जयभवानीनगर परिसरात लोकांच्या मते दहा ते पंधरा जणांना त्याने चावे घेतले. तर घाटी प्रशासनाकडून तीनजण उपचारासाठी आल्याचे सांगण्यात आले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

श्‍वानपथकाची कसरत 
प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, तो कुत्रा पिसाळलेला होता. ही घटना पाहणारे ज्ञानेश्‍वर चव्हाण यांनी शहर परिवर्तन आघाडीचे राहुल इंगळे यांना माहिती दिली. यानंतर त्यांनी ही माहिती महापालिकेच्या श्‍वान पथकाचे डॉ. शेख यांना दिली. काही वेळातच महापालिकेचे श्‍वान पथक दाखल झाले. मग सुरु झाली कुत्र्याला पकडण्याची कसरत. बराच वेळ झुंजल्यानंतर 
मोहम्मद सलीम, महादू सुरे, सुदाम शिंदे, धनंजय घोलप, प्रदीप जाधव, राधाकृष्ण गायकवाड यांनी जयभवानीनगर भागात एका गल्लीतील रस्त्यावर या पिसाळलेल्या कुत्र्याला जाळीने पकडले. राहुल इंगळे, बापू कवळे, ज्ञानेश्वर चव्हाण, दीपक परेराव, प्रवीण वखरे यांनी श्‍वानपथकाला तो कुत्रा पकडण्यासाठी मदत केली. पकडण्यापूर्वीही कुत्र्याने मीरा बोरुडे या महिलेच्या हाताचा चावा घेतला. त्यांना घाटी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अर्धपोटी कुत्रे पिसाळण्याची शक्यता 
लॉकडाउनच्या काळापासून शहरातील हजारो कुत्री अर्धपोटी आहेत. रस्तोरस्ती या कुत्र्यांची टोळकीच उभी असलेली दिसून येतात. रात्री-अपरात्री तर ही कुत्री ये-जा करणारांच्या अंगावर धावून जातात. अर्धपोटी असल्याने त्यांच्यात आजारही बळावले आहेत. त्यामुळे ते अधिकच हिंसक झाले आहेत. त्यामुळे महापालिकेने तातडीने कुत्रे पकडण्याची मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

संपादन ः प्रवीण मुके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मुख्यालयात रात्रीस खेळ चाले! निवडणूक जाहीर होताच प्रशासनाचा रात्रभर 'कारभार', आचारसंहिता भंग?

Ashes Test: पुन्हा राडा! ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अम्पायरला घेरले; मिचेल स्टार्कचे वादग्रस्त विधान स्टम्प माईकने टिपले, Viral Clip

Latest Marathi News Live Update : पुणे काँग्रेसभवन मध्ये इच्छुकांची मोठी गर्दी

Bank Holiday : आजपासून 5 दिवस देशभरातील बँका बंद! राज्यातील बँकाही 4 दिवस बंद; कधी ते जाणून घ्या?

विदर्भाचे दोन्ही पोट्टे IPL मध्ये चमकणार! SRH-Mumbai Indians कडून उतरणार मैदानात, विदर्भाच्या क्रिकेटचा नवा अध्याय!

SCROLL FOR NEXT