Sugarcane Crop In Aurangabad esakal
छत्रपती संभाजीनगर

ऊसाच्या तुऱ्याने घातली शेतकऱ्याच्या चिंतेत भर! वजनात होतेय घट

गळीत हंगामाला झालेला उशीर, ऊसतोड मजुरांचा तुटवडा, बदलते वातावरण याचा विपरीत परिणाम ऊस पिकावर प्रकर्षाने दिसू लागला आहे.

हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : गतवर्षापेक्षा यंदा लवकर ऊस परिपक्व होऊन ऊसाला तुरे फुटून अवघे शेतशिवार पांढरे झाल्याचे दिसत आहे. गळीत हंगामाला झालेला उशीर, ऊसतोड मजुरांचा तुटवडा, बदलते वातावरण याचा विपरीत परिणाम ऊस पिकावर प्रकर्षाने दिसू लागला आहे. त्यामुळे सध्या जेथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत उसाला तुरे आल्याचे चित्र पाचोडसह (ता.पैठण) (Paithan) चौफेर पाहावयास मिळते. दुष्काळीस्थितीमुळे पैठण तालुक्यातील उस व केळीचे पीक इतिहासजमा झाले होते. जायकवाडी धरण (Jayakwadi) प्रथमच आटल्याने त्याच्या भरवशावर गोदावरी (Godavari) पट्ट्यातील ऊसाचे क्षेत्र ही दृष्टीआड होऊन संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे बॉयलरच पेटले नाही. अशातच चौंढाळा येथे रेणुकादेवी सहकारी साखर कारखान्याची (Aurangabad) भर पडली. जेथे एका कारखान्यास ऊस मिळेना तेथे दुसऱ्याची भर ही चिंतेची बाब ठरली होती. (Sugar Cane Crop Face New Problem In Paithan Taluka of Aurangabad)

ऊसाअभावी एकच कारखान्याचे बॉयलर पेटण्याची चिंता लागून होती, तेथे दुसऱ्या कारखान्याचा विचार करणे दुरापास्त होते. परंतु अलीकडे तीन वर्षांत अवेळी पावसाचे प्रमाण अधिक राहून पावसाने सरासरी ओलांडली, अन् उसाची १४ हजार ४६४ हेक्टरवर लागवड झाली. एवढेच नव्हे तर अद्यापही उसाची लागवड करण्याची लगीनघाई परिसरात सुरुच आहे. इतिहासजमा झालेला ऊस गत तिन वर्षांपासून दोन्ही कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण करीत पैठण तालुक्याच्या सीमेवरील गंगामाई व छत्रपती संभाजी कारखान्याचीही गरज पूर्ण करीत आहे. आज उसाचे क्षेत्र कारखान्यास पेलवेनासे झाले असून येणाऱ्या आगामी वर्षात अतिरिक्त उसाचा प्रश्र गंभीर बनण्याचे चिन्हे दिसत आहे. यंदा साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले असतानाही ऊसतोडणीचे क्षेत्र तीस टक्के आटोपते झाले. ऊस तोडणीस रस्ते, वाहतुक, मजुर टंचाईमुळे उशीर होत आहे. परिणामी त्यामुळे उसाला तुरे येत आहेत. त्यामुळे उसाचे वजन घटण्याची शक्यता उत्पादकांतून वर्तविण्यात येत आहे. शेतकरी ऊस पिकाकडे शाश्वत पीक म्हणून पाहू लागला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती व प्रगती होण्यास साखर कारखान्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

ऊस हे मोसंबीनंतर नगदी पीक म्हणून ओळखले जाते. ऊसाचे पीक म्हणजे शेतकऱ्यांच्या भरवशाचे अन् हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून त्याकडे पाहीले जाते. मात्र यंदा ऊस गाळपाला नियोजित वेळेपेक्षा अधिकचा उशीर झाल्याने व जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्यांचे प्रमाणात घट होऊन सर्रास उसाला तुरा आला आहे.अतिरिक्त ऊस दराची कोंडी, भारनियमन, खतांच्या वाढत्या किंमती, लोकरी मावा, हुमणी अळी, अवकाळी पावसामुळे अस्ता व्यस्त पडलेला ऊस आदी विविध कारणांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आलेले तुरे पुन्हा भर घालत आहे. तुरा आलेला ऊस दीड-दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस शेतात राहिला तर त्याची वाढ थांबून वजनात घट होणार असल्याने त्यांना मोठा तोटा सोसावा लागणार असल्याचे बोलले जाते.

'उसाला फुटवे फुटणे, दशी पडणे अशा प्रकारामुळे उसाची वेळेत तोडणी न झाल्यास उसाच्या फोस होईल. उसाला तुरा आल्यानंतर त्याची तोड वेळेत होणे गरजेचे आहे. पण ऊस तोडण्यासाठी मजूरही तुऱ्याच्या उसाला नापसंती दर्शवित आहेत. त्यास तुरे येणे म्हणजे ऊस परिपक्व झाल्याची लक्षणे आहेत. यंदा वातावरणातील बदलामुळे लवकरच तुरे आले आहेत. मात्र त्याचा थेट उसाच्या वजनावर लगेच परिणाम होत नाही. तुरे आल्यानंतर दोन महिन्यांच्या पुढे ऊस पोकळ होऊन वजनात घट होते. कारखान्यांचे गळीत हंगाम आणखी दोन महिनेच चालणार आहेत. त्यामुळे वजनावर परिणाम होणार नाही',असे संत एकनाथचे उपाध्यक्ष भास्करराव राऊत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT