Sugarcane In Aurangabad
Sugarcane In Aurangabad esakal
छत्रपती संभाजीनगर

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न बिकट​, गळीत हंगाम संपण्यापूर्वी लाखो टन उस शिल्लक ?

नानासाहेब जंजाळे

शेंदूरवादा (जि.गंगापूर ) : गंगापूर तालुक्यातील एकमेव सुरू असलेल्या मुक्तेश्वर साखर कारखान्याचा (Mukteshwar Sugar Mill) निम्मा हंगाम संपला आहे. या वर्षीचा हंगाम संपण्यासाठी दीड महिना उरला असताना गंगापूर (Gangapur) तालुक्यात आजही सहा लाख टनापेक्षा अधिक ऊस उभा आहे. त्यामुळे ऊसतोडीसाठी शेतकरी साखर कारखान्यांचे उंबरठे झिजवून ऊसतोड मुकदमाच्या विनवण्या करून हैराण झाला असून हंगाम संपण्यापूर्वी दोन लाखांपेक्षा अधिक टन ऊस शिल्लक राहण्याची शक्यता आहे.​ गेल्या दोन वर्षांपासून पर्जन्यमानात झालेली वाढ व इतर पिकांमधून मिळत नसलेली शाश्वत उत्पन्नमुळे शेतकरी ऊस पिकाकडे वळल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्धता वाढली. (Surplus Sugarcane Problem Become Critical In Aurangabad Region)

या वर्षीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी तालुक्यात पंधरा लाख टनापेक्षा अधिक ऊस गाळपासाठी उपलब्ध होता. हंगाम सुरू होऊन चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही तालुक्यात सहा लाख टनापेक्षा अधिकचा ऊस (Sugar) शिल्लक असून मे अखेरपर्यंत साखर कारखाने गाळप करतील असे गृहीत धरले तरी यातील बराच ऊस गाळपाअभावी शिल्लक राहण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. तत्काळ नियोजन करून अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी औरंगाबाद (Aurangabad) जिल्हा नियोजन समिती सदस्य कृष्णा सुकासे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब शेळके, ताराचंद दुबिले, आनंदा निकम, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर देशमाने आदींनी केली आहे.

​ ​

तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड

गंगापूर तालुक्यातील एकमेव साखर कारखाना असलेल्या मुक्तेश्वर शुगरच्या नोंदीनुसार चालू वर्षी ७०८६ हेक्टर ऊसाच्या नोंदी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जवळपास साडेसहा लाख टन गाळपासाठी होता. तसेच बिगर नोंदी असलेले ऊस देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दोन्ही मिळून पंधरा लाखांपेक्षा अधिकचा ऊस गाळपासाठी उपलब्ध होता.​

बाहेरील कारखान्यांनी पाठ फिरवली

जिल्ह्यातील बारामती, संभाजीराजे, घृष्णेश्वरसह नगर जिल्ह्यातील संजीवनी, गंगामाई, ज्ञानेश्वर, सोनई, प्रवरा, संगमनेर, अशोकनगरसह इतर कारखाने दरवर्षी ५० ते ५३ टक्के ऊस बाहेरील कारखाने घेऊन जातात, परंतु या वर्षीच्या आकडेवारीनुसार तालुक्यात उभ्या असलेल्या ऊसापैकी अवघे २७ टक्केच ऊस बाहेरील कारखान्यांनी नेला आहे.​ या वर्षी औरंगाबाद जिल्ह्यासह अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गतवर्षीच्या तुलनेत अतिशय कमी टोळ्या पाठवून पाठ फिरवल्यामुळे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर झाला आहे.​

​ ​

अडीच ते तीन लाख टन ऊस राहणार शिल्लक

तालुक्यातील मुक्तेश्वर शुगरने फेब्रुवारी अखेर साखर आयुक्तालयाला दिलेल्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडील नोंदीनुसार तीन लाख मे.टनापेक्षा अधिक उस शिल्लक आहे. तर बिगर नोंद असलेल्या आकडेवारी देखील तीन लाख टनाच्या जवळपास असून दोन्ही मिळून सहा लाख उभा गृहित धरला तरी ऊसतोडीच्या गतीवरून मे अखेर अडीच ते तीन लाख टन शिल्लक राहू शकतो अशी स्थिती आहे.​

​ ​

बाहेरील कारखान्यांना सक्ती आवश्यक

बाहेरील कारखान्यांना गत वर्षीच्या तुलनेत ऊसतोडीसाठी अतिशय कमी टोळ्या पाठवल्या व ऊस तोडून नेण्याकडे पाठ फिरवला. त्यामुळे गंगापूर तालुक्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न बिकट झाल्यामुळे साखर आयुक्तालयाने अशा कारखान्यांनी गतवर्षी तालुक्यातील कार्यक्षत्रातून तोडून नेलेल्या ऊसाची आकडेवारी व तोडीसाठी पाठवलेल्या तोड्यांसाठीचे कामगार संख्या पाहून किमान त्या प्रमाणात पुढील महिना दीड महिन्यात तोडून नेणे बंधनकारक केल्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल.​

कायमचा उपाय

गंगापूर तालुक्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न बिकट असला तरी पुढील काळात देखील उसाची लागवड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कायम बाहेरील कारखान्यांवर अवलंबून न राहता बंद असलेला गंगापुर सहकारी साखर कारखाना कुठल्याही परिस्थितीत सुरू करून मुक्तेश्वर शुगर मिल या खासगी कारखान्याची गाळप क्षमता वाढवली तरच अतिरिक्त उसाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल असे जाणकारांचे मत आहे.

मराठवाड्यातील अतिरिक्त ऊसाच्या संदर्भात नुकतीच विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांनी बैठक घेतली असून औरंगाबाद जिल्ह्यातील ९ लाख मेट्रिक टन अतिरिक्त ऊसाबाबत जिल्ह्यातील सर्वच कारखान्याचा समन्वयाने मे अखेर अतिरिक्त ऊस संपवण्याचे नियोजन सुरू आहे.

- सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी, औरंगाबाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT