sushant singh rajput 
छत्रपती संभाजीनगर

सुशांतसिंह रातपूतने केली नसती आत्महत्या... 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : धकाधकीच्या जीवनामुळे ताणतणाव वाढत आहेत. अशा तणावात मनाला स्थिर व शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योग-प्राणायामची प्रत्येकाला नितांत गरज आहे. कोरोनाच्या महामारीत तर तुम्ही फिट आहात का? याचे प्रमाणपत्र देण्याची वेळ आली आहे. तुम्हाला मानसिक व शारीरिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी योगशास्त्र महत्त्वाची भूमिका बजावते. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने योग-प्राणायाम केले असते तर तो मानसिकदृष्ट्या परिपक्व झाला असता आणि आत्‍महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले नसते, असे मत योगतज्ञ प्रज्ञा तल्हार यांनी व्यक्त केले. 

जागतिक योगदानानिमित्त ‘सकाळ’शी सोबत बोलताना प्रज्ञा तल्हार म्हणाल्या, की कोरोनाच्या महामारीने जगाला हाच संदेश दिला आहे की, निरोगी आयुष्याशिवाय काहीच महत्त्वाचे नाही. आरोग्यसोबतच जीवनातील ताणतणाव कमी करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. योग-ध्यानसाधनेच्या माध्यमातून आपली आंतरिक शक्ती वाढविण्यास मदत होते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने नुकतीच आत्महत्या केली. त्याने एकतरी योग शिबिर केले असते तर एवढे टोकाचे पाऊल उचलले नसते. तुमची मानसिकता स्थिर ठेवण्याचे काम योग-ध्यानसाधनेतून होते. त्यामुळे प्रत्येकाने योग म्हणजे काय? ध्यान साधना म्हणजे काय? याची एकटक्का जरी माहिती घेतली, तरी प्रत्येकाचे जीवन सुखकर होईल, असे श्रीमती तल्हार म्हणाल्या. 

नऊ वर्षांपासून योग शिबिर 
दहा वर्षांपूर्वी योगामध्ये पदविका घेतल्यानंतर गेल्या नऊ वर्षांपासून योगचा प्रसार करण्याचे व अध्ययनाचे काम अविरतपणे काम सुरू आहे. विद्याभारतीच्या देवगिरी प्रांताच्या योग प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडताना सिडको एन-२ भागात वर्षभर दर रविवारी सकाळी सहा ते नऊ या वेळेत योग वर्ग घेतले जातात, असे प्रज्ञा तल्हार यांनी सांगितले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५०० कोटींचं प्रकरण केंद्राकडे? मोदींना पत्र, शिंदेंच्या नेत्यांकडून फडणवीसांची भेट! जरांगेंनी उघड केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये ९ जण कोण?

Satara News: जलमंदिर पॅलेसवर रवींद्र चव्हाण यांचे स्वागत; उदयनराजेंकडून शिवरायांचे शिल्प देऊन सत्कार

China Earthquake : तिबेट नंतर आता चीन, पाकिस्तान अन् अफगाणिस्तानही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; बचावकार्य तातडीने सुरू, बर्फवृष्टीचे संकट

Marathi News Live Updates : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, विवेकानंदनगरमधील महापालिका हिंदी शाळेतील मतदान केंद्रावर मतदारांची लगबग

Jaywant Sugar: ‘जयवंत शुगर’समोरील वजन काटा पाडला बंद; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊसदर जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT