The teacher distributed eight sacks of grain in the field 
छत्रपती संभाजीनगर

शिक्षकानेच वाटले स्वतःच्या शेतातील आठ पोती धान्य 

संदीप लांडगे

औरंगाबाद - कोरोनाच्या काळात एकीकडे मदतीसाठी हजारो हात पुढे येत असतानाच उद्याच्या काळजीने सर्वच गोष्टींचा साठा करून ठेवण्याची प्रवृत्तीही वाढली आहे. अनेक ठिकाणी माणसातील माणुसकी हरवत चाललेली पहायला मिळते. पण या प्रवत्तीला छेद दिलाय ज्ञानेश्‍वरवाडी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक अय्युब शेख यांनी. त्यांनी स्वतःच्या शेतात पिकवलेले दहापैकी आठ पोती धान्य गोरगरिबांची चूल पेटविण्यासाठी वाटून दिले.
 
लॉकडाऊनमळे गरजू व गरीब आदिवासी बांधवांना पंधरा दिवसांपासून रोजगार नसल्यामुळे घरातच बसण्याची वेळ आली आहे. मुख्याध्यापक अय्युब उस्मान शेख (रा. कुरणपिंपरी) यांना तुकारामाचे अभंग, हरीपाठ तसेच कुराण तोंडपाठ आहे. गोरगरीबांची उपासमार त्यांनी जवळून पाहिली. दलीत वस्तीवरील मुलांची भाकरीसाठी उन्हातान्हात गावात फिरणे पाहून त्यांचे मन गहिवरुन आले. त्यांनी पत्नीशी चर्चा करत शेतातील दहापैकी आठ पोते गरीब मजूरांना वाटण्याचा विचार व्यक्त केला. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पत्नीनेही त्यांना पाठिंबा दर्शविला. त्यासाठी तहसीलदार यांच्या परवानगी घेवून त्यांनी आपेगाव, तसेच परीसरातील वाड्या, वस्त्यावरील गरजू, गरीब कुटूंबाला प्रत्येकी पाच किलो धान्य वाटप केले. यासाठी गावातील पोलीस पाटील व कोतवाल यांच्या मदतीने सोशल डिस्टन्स ठेवत धान्य वाटप करण्यात आले. त्यांच्या या मानवतावादी कार्याचे सर्वच स्तरावरुन कौतूक केले जात आहे. शिक्षक सेनेतर्फे त्यांचे विशेष कौतूक करण्यात आले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

लॉकडाऊन संपेपर्यंत 
सर्वांसाठी मदत
 
याबाबत मुख्याध्यापक अय्युब शेख यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगीतले की, यंदा आमच्या शेतात दहा पोते गव्हाचे उत्पादन झाले होते. पंरतू, लॉकडाऊनमुळे गावाच्या आजूबाजूला असलेल्या वस्त्या, तांडे, दलीतवाड्यात परिस्थिती बीकट झाली आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती पाहून मी स्वतःच्या घरातील धान्याचे कोठार खुले करुन प्रत्येका पाच किलो गव्हाचे वाटप केले आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत सर्वांसाठी मदत करत राहाणार. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Latest Marathi News Updates : एससी आरक्षण बदलल्याचा खोटा प्रचारः राहुल डंबाळे

SCROLL FOR NEXT