vertical garden) sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : शहरात दहा ‘व्हर्टीकल गार्डन’

८५ लाखांचा खर्च : निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरांच्या प्रदूषणात (pollution) वाढ होत असल्याने महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. अनेक चौकात कारंजे लावण्यात येणार असून, त्यासोबतच व्हर्टिकल गार्डन (vertical garden) विकसित केले जाणार आहे. त्यासाठी दहा जागा निश्‍चित करण्यात आल्या असून, निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या व्हर्टीकल गार्डनवर ८५ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.

शहराचे प्रदूषण धोकादायक पातळीवर पोचले होते. त्यामुळे काही वर्षापूर्वी एमआयडीसी भागात नव्या कंपन्यांची परवानगी थांबविण्यात आली होती. दरम्यान हवामान बदलाच्या पार्श्‍वभूमीवर शहरांचे तापमान कमी करण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकांना देण्यात आल्या आहेत. औरंगाबाद शहरातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध चौकात कांरजे सुरू केले जाणार आहेत. त्यासोबतच व्हर्टिकल गार्डन उभारण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. प्रयोग म्हणून सिद्धार्थ उद्यानाशेजारी नाल्याच्या दोन्ही बाजूने व्हर्टिकल गार्डन उभारण्यात आले आहे. त्यानंतर आता आणखी १० ठिकाणी अशाच पद्धतीचे व्हर्टीकल गार्डन तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निविदा दाखल करण्याची सोमवारी (ता. १७) अंतिम मुदत होती. याविषयी उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले की, शहरात आणखी आठ ते दहा ठिकाणी व्हर्टिकल गार्डन उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. शहराचे प्रदूषण कमी करण्यासाठी हे व्हर्टिकल गार्डन महत्त्वाचे आहे.

या जागा झाल्या निश्‍चित

व्हर्टीकल गार्डनसाठी उड्डाणपुलाच्या भिंतीचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार सिडको बसस्थानक चौकातील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजू, महाविर चौक, पंचवटी चौक व शहरातील विविध नाल्याच्या दोन्ही बाजूंनी हे व्हर्टीकल गार्डन विकसित केले जाईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.(Aurangabad News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

पुलाचा एक मार्ग सुरू करण्याची घाई ११ जणांच्या जीवावर, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी; मुरबाडवर शोककळा

Jalgaon Temperature : जळगावसह जिल्ह्याचा पारा पोहोचला ४१ अंशांवर; रस्‍त्‍यांवर दुपारी शुकशुकाट

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT