Corona News Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

कोरोना चाचण्यासंदर्भात शासनाच्या काय आहेत नव्या सूचना वाचा

माधव इतबारे

औरंगाबाद ः कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे आदेश दिले जात आहेत. असे असतानाच आता लक्षणे असतील तरच चाचण्या करण्याच्या नव्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. प्रवास करणारे व्यक्ती, व्यापाऱ्यांना लक्षणे नसतील तर त्यांच्या चाचण्या करू नका, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी पाच महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. सुरवातीला आरटीपीसीआर पद्धतीने चाचण्या केल्या जात होत्या. यात एका चाचणीसाठी सुमारे अडीच ते तीन हजार रुपयांचा खर्च येतो तर अहवाल चोवीस तासांनंतर मिळतो. दरम्यान, गेल्या महिन्यापासून स्वस्त अँटीजेन पद्धतीच्या कीट उपलब्ध झाल्या. पाचशे रुपयांमध्ये असलेल्या या किटमुळे अहवाल अवघ्या वीस मिनिटांत मिळतो. त्यामुळे बाधित रुग्ण तातडीने समोर येतात.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तसेच संशयितांना क्वारंटाइन करण्यासाठी लागणार खर्च कमी होतो. संसर्ग रोखण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्यानंतरही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात केंद्र शासनाने कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे आदेश नुकतेच काढले होते. असे असतानाच शुक्रवारी (ता.२१) राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने नव्याने मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. त्यात लक्षणे असतील तरच चाचण्या करण्याचे आदेश आयसीएमआरच्या हवाल्याने यंत्रणेला देण्यात आले आहेत. 
 
अशा आहेत नव्या सूचना 
ज्या व्यक्तींवर उपचारासाठी चाचणी करणे आवश्‍यक आहे, त्यांची अँटीजेन चाचणी करण्यात यावी. त्यामुळे अर्ध्या तासात उपचारासंदर्भात निर्णय घेणे शक्य होईल. 
अँटीजेनमध्ये निगेटिव्ह आलेले; पण लक्षणे असलेले नागरिक तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या हायरिस्कमध्ये असलेले व विदेशातून आलेल्या व्यक्तींचीच आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी. 
रुग्णालयात येण्यापूर्वी मृत्यू पावलेल्या व्यक्ती, बाळंतपणासाठी आलेल्या माता, अत्यावश्‍यक शस्त्रक्रियेचे रुग्ण यांची ट्रूनॉट चाचणी करण्यात यावी. ज्याठिकाणी ही सुविधा नाही तिथे अँटीजेन चाचणी करण्यात यावी. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मनोरुग्णालयात दाखल होणाऱ्या व्यक्तींना सुरवातीला एक आठवडा क्वारंटाइन ठेवावे. त्यानंतर अँटीजेन चाचणी करावी. 
तुरुंगात कैदी दाखल झाल्यानंतर एक आठवडा क्वारंटाइन ठेवावे, त्यानंतर अँटीजेन चाचणी करावी. चाचणीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात यावा. 
बऱ्याच जिल्ह्यात एकाच रुग्णांच्या दोन-तीन चाचण्या होत आहेत. त्यामुळे शासनावरील आर्थिक भार वाढतो. त्यामुळे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चाचण्या कराव्यात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT