File Photo 
छत्रपती संभाजीनगर

वाचा.. औरंगाबादेत या भागात आढळले नवीन तीन कोरोनाबाधीत

मनोज साखरे

औरंगाबाद -  कोविड 19 चा संसर्ग झालेल्या तीन नवीन कोरोना रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे या आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 35 झाली असून प्रत्यक्षात 17 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

पस्तीसमधील तिघांचा मृत्यू तर 15 रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. उपचार घेत असलेल्या जुन्या दोन रुग्णांची दुसरी चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. नवीन रुग्णात समतानगरातील दोन, बिस्मिल्ला कॉलनीतील एकाचा समावेश आहे.

 समतानगर येथील 18 वर्षीय आणि 20 वर्षीय तरुण व बिस्मिल्ला कॉलनी येथील 40 वर्षीय व्यक्तिला कोरोनाची लागण झाली आहे. असे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगीतले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

 बिस्मिल्ला कॉलनी येथील 40 वर्षीय व्यक्ती आधीच्या बाधीत असलेल्या रुग्णांच्या संपर्कातील आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधीत उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडा आता 17 इतका झाला आहे. नवीन तिघा बाधितांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

31जणांचे अहवाल निगेटिव्ह 
जिल्हा रुगालयात एकूण 47 रुग्णांची आज तपासणी झाली. त्यापैकी 24 जणांना घरीच अलगिकरणात राहण्याचा सल्ला दिला. 36 जणांच्या लाळेचे नमुने घेऊन घाटीतील प्रयोगशाळा येथे पाठवण्यात आले आहे.

31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 7 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. आताच्या नवीन तीन रुग्णांसाह मिनी घाटीमध्ये सध्या 15  कोरोनाबाधित रुग्णांवर विलगिकरण कक्षात, दोन कोरोना बाधितांवर घाटीमध्ये उपचार सुरू आहेत.   तर देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या 28 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT