Aurangabad Accident News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Accident News | वैजापूर-गंगापूर रस्त्यावर भीषण अपघात; ३ मजूर ठार

वैजापूर- गंगापूर रस्त्यावर ऊसाचा ट्रक व पिकअपची समोरासमोर जोरदार धडक

सकाळ वृत्तसेवा

वैजापूर (जि.औरंगाबाद) : ऊसाचा ट्रक व पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन मजूर ठार, तर एक जखमी झाला. वैजापूर-गंगापूर (Gangapur) रस्त्यावर वरखेड पाटी जवळ शुक्रवारी (ता.१८) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैजापूरकडे जाणारा ऊसाचा ट्रक आणि समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅन या दोन्ही वाहनांची वैजापूर (Vaijapur) - गंगापूर रस्त्यावर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. (Three Workers Died In Accident On Gangapur Vaijapur Road In Aurangabad)

या अपघातात पिकअप व्हॅनचा चुराडा होऊन त्यामध्ये प्रवास करणारे अरविंद सुरवसे (वय २८, रा.सोलापूर), अक्षय क्षीरसागर (वय ३०, रा.सोलापूर) व गणेश शिरसाठ (वय ३०,रा.अहमदनगर) या तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर शिवशंकर संघवी (रा.चाकूर, जि.लातूर) हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी औरंगाबादला (Aurangabad) हलविण्यात आले आहे.अपघातस्थळी पोहोचलेल्या डॉ. प्रशांत पांढुरे, डॉ. नितीन वालतुरे, सुराशे, अजीम पटेल व अनंता कुमावत यांनी मदतकार्य केले. पिकअप व्हॅनमधील मृत व जखमी मजुरांना त्यांनी बाहेर काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT