3bamu 
छत्रपती संभाजीनगर

मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

अतुल पाटील

औरंगाबाद :  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आज मंगळवारपासून (ता. २२) सुरू होत आहे. औरंगाबाद मुख्य परिसर तसेच उस्मानाबाद उपपरिसर येथील सर्व अभ्यासक्रमांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे.
विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील ४५ विभाग आणि उस्मानाबाद उपपरिसरातील १० विभागात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. या वर्षी एम.फिल. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविली.

या संदर्भात प्र-कुलगुरु डॉ. शाम शिरसाठ, प्रवेश समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड, पदव्यूत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. दिगंबर नेटके यांच्या उपस्थितीत कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक घोषित करण्यात आले. विद्यार्थ्यांना २२ ते ३१ डिसेंबर दरम्यान, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल. २ जानेवारी रोजी प्राथमिक यादी तर, ६ जानेवारीला प्रवेशित विद्यार्थ्यांची पहिली यादी, १८ जानेवारीला दुसरी यादी तर, २३ जानेवारीला तिसरी यादी आणि स्पॉट अ‍ॅडमिशन देण्यात येणार आहेत. पदव्यूत्तर विभागाच्या तासिका १८ जानेवारीपासून सुरु करण्यात येणार आहेत. पदव्यूत्तर विभागातील विषय, उपलब्ध प्रवेशित जागा, आरक्षण, शुल्क, पात्रता आदी सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधी होणार? तारखेबाबत महत्वाची अपडेट समोर; प्रशासनाकडून नवा आदेश जारी

Gold And Silver Rate: महत्त्वाची बातमी! २०२६ च्या अखेरपर्यंत सोने आणि चांदीचे दर किती असणार? तज्ञांनी आकडाच सांगितला!

Ranji Trophy : ऋतुराज गायकवाडचा भोपळा, पृथ्वी शॉच्या पाच धावा; महाराष्ट्राची ६ बाद ६६ अशी अवस्था, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश अशक्य

Leopard Viral Video Kolhapur : बिबट्या गायीच्या पिल्लाशी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल, कोल्हापुरातील घटना; शेतकऱ्यांमध्ये भीती

Shubhanshu Shukla : बंगळुरूच्या मातीत लपलेला चमत्कार! मंगळावर घरं बांधण्यात करणार मदत; पण कसं? शुभांशू शुक्लांचे आश्चर्यकारक संशोधन पाहा

SCROLL FOR NEXT