Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

पिशोर : समोर दुचाकी आली, अन ट्रक झाला पलटी..ते कसे वाचा.

सकाळ वृत्तसेवा

पिशोर : मालाने भरलेल्या ट्रक समोर अचानक दुचाकी आली. दुचाकी चालकाला वाचविण्याच्या नादात  ट्रक चालकाचा ताबा सुटला अन ट्रक शेतात उभ्या असलेल्या विजेच्या खांबाला धडकला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ट्रक कसा झाला पलटी ते पुढील प्रमाणे. 

अरे बाप रे ! मोरांना विष अन् नीलगायी, रानडुकरांना देतात शॉक ! 
मिळालेल्या माहितीनुसार , पिशोर पासून तीन किलोमीटर अंतरावर भोकरदन येथून गुजरातकडे मका भरून चाललेला ट्रक (एम.एच. २१ बी एच ०४१७) समाेरुन आलेल्या दुचाकीस्वारास वाचवण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला शेतात पलटी झाला. रस्त्याच्या कडेला असलेला विजेचा खांबावर ताे  ट्रक अडकल्याने खांब पूर्णपणे झुकला.

सुदैवाने या अपघातात ट्रक चालक महेरे (वय २५) आणि क्लिनर सोमीनाथ गाडेकर (वय २५ दोघेही रा.भोकरदन) यांना किरकोळ इजा झाली.  त्यातच ज्या शेतात हा ट्रक पलटी झाला त्या शेताच्या कडेने वीज वाहून नेणाऱ्या खांबाला हा ट्रक अडकल्याने शेतात काम करणाऱ्या स्त्रिया व पुरुष  सुदैवाने अगदी थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्यामध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले हाेते. 

भराडी- शिवूर रस्त्यावर.. होतात नेहमी अपघात

भराडी-शिवूर रस्त्याचे काम विविध टप्प्यात सूरु आहे. परंतु या रस्त्याचे पिशोर ते रामनगर हे सहा किलोमीटर चे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. या रस्त्यावर अतिशय कमी जागा असल्याने हा ट्रक रस्त्याच्या खाली गेला. रस्त्याच्या कामातील दिरंगाई व दर्जाबद्दल वेळोवेळी 'सकाळ' वर्तमान पत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

या टप्प्यात सर्रास माती युक्त गाळ वापरणे, कामात धरसोड वृत्ती मुळे या रस्त्यावर नेहमी छोटे मोठे अपघात घडत असतात. सध्या पावसाळा सुरू होण्याच्या काठावर असताना चिखल होणे,चिखलात वाहने रुतने, वाहने रस्त्यावर घसरणे हे घडत राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT