Truck driver arrested for causing death of three people Samruddhi Mahamarg accident  
छत्रपती संभाजीनगर

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धीवर तीन जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकास अटक

Accident News : समृद्धी महामार्गावर मेहकर नजिकच्या फरदापूर टोल प्लाझा जवळ ४ जून रोजी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Mehkar News : समृद्धी महामार्गावर मेहकर नजिकच्या फरदापूर टोल प्लाझा जवळ ४ जून रोजी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता.अपघातास कारणीभूत वाहन घटनास्थळावरून निघून गेले होते. मेहकर पोलिसांनी मुंबईपर्यंत कसोशीने तपास करत ट्रकसह चालकास ६ जुलै रोजी ताब्यात घेतले आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस येथील मांटे कुटुंबातील सदस्य त्यांच्या कारमधून वाशीम येथून देऊळगाव राजाकडे जात होते. दरम्यान फरदापूर टोल प्लाझाजवळ उभे करून रस्ता ओलांडत असतांना नागपूरकडून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना चिरडले. या अपघातात विजय मांटे, तुषार मांटे आणि ओम मांटे यांचा मृत्यू झाला होता.अपघातानंतर ट्रक निघून गेला होता.

सदर वाहनाचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, मेहकर पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांची विविध पथके तयार करण्यात आली होती.

मेहकर ते संभाजीनगर आणि पुढे मुंबईपर्यंत सर्व टोल प्लाझामधील सीसीटी व्ही कमेऱ्यांमधील फुटेज, अपघातसमयी व नंतर कुठले वाहन कोणत्या वेळी कुठे असेल हे गती तपासून अपघातास कारणीभूत वाहनाचा शोध घेण्याचे गुंतागुंतीचे काम होते. पण तपास चमुंनी उकल करत सदर ट्रकचा शोध लावून ते वाहन क्रमांक के ए ३४ बी ७१९५ मेहकर येथे स्टेशनला जमा करून आरोपी चालकास ताब्यात घेतले आहे.

तपास पथकांमध्ये अशोक जायभाये , शिवानंद केदार, रविंद्र चिंचोले, गणेश बांडे, करीम शाह, विकास झोटे यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT