Corona News Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

लॉकडाऊन घेतला पण... वाढले एवढे रुग्ण 

माधव इतबारे

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या तब्बल नऊ दिवसानंतर शहरातील रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याने दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. असे असले तरी गेल्या नऊ दिवसात जिल्ह्यात २,७०१ रूग्णांची वाढ झाली आहे. तसेच ५७ जणांचा मृत्यु झाला आहे. 

शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १० ते १८ जुलै दरम्यान लॉकडाऊनची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यात आली. नागरिकांनीही प्रशासनाला शंभर टक्के साथ दिली. लॉकडाऊनमुळे रुग्ण संख्या कमी होईल, असा नागरिकांचा अंदाज होता. मात्र याच काळात महापालिकेने अॅन्टीजेन पद्धतीने चाचण्यांचे प्रमाण वाढविले व रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढली. १० ते १८ जुलैदरम्यान रोज सरासरी दोनशे ते तिनशेपेक्षा अधिक रूग्ण आढळून आले. १५ जुलैला तब्बल ३७९ रूग्णांची भर पडली होती. हे रूग्ण शहरासह वाळूज-बजाजनगर परिसरातील आहेत. दुसरीकडे या नऊ दिवसांत १,८२४ रूग्ण उपचारातून कोरोनामुक्त झाले आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

२४ तासांत १२ मृत्यू 
केंद्रीय पथकाने मृत्युदर कमी करण्यावरच अधिक लक्ष देण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. त्यानुसार प्रयत्न सुरू आहेत. मात्र गेल्या चोविस तासात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनच्या नऊ दिवसांत ५४ जणांचा मृत्यु झाला होता. १८ जुलैला जिल्ह्याचा मृत्युदर ३.७६ एवढा नोंदला गेला. शहराचा मृत्युदर हा ४.५२ एवढा होता. आता लॉकडाऊननंतरच्या नऊ दिवसांत सोमवारी (ता. २७ ) दुपारपर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण ४४९ जणांचा मृत्यु झाला असून, मृत्युदराचे हे प्रमाण ३.४२ टक्के एवढे आहे. 

आणखी २,३४६ जणांची चाचणी 
शहरात दिवसभरात दोन हजार ३४६ अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यातील ७८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत शहाच्या सहा एण्ट्री पॉइंटवर एक हजार ३८ जणांच्या अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३५ जण पॉझिटिव्ह निघाले. सहा जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये १८० जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. मोबाईल पथकांच्या माध्यमातून दिवसभरात एक हजार ३०८ जणांची अॅन्टीजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी ४३ जण पॉझिटिव्ह निघाले. दिवसभरात १९३ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्याचे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Heatwave : तापमानाच्या चाळिशीने विदर्भ हैराण; एप्रिल महिन्यात १८ दिवस तापदायक अनुभव

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जमीन मोजणीला शेजारचा विरोध करीत असल्यास काय करावे? मोजणीसाठी ५९० शेतकऱ्यांनी पोलिसांना मोजले ३० लाख रुपये, वाचा...

आजचे राशिभविष्य - 05 मे 2026

खाकीमागे दडलेले संघर्षमय जीवन! आरोपींच्या शोधात वडापावावर काढावे लागतात दिवस; वर्षातील १०० दिवस कुटुंबापासून दूर हजारो किमी प्रवास अन्‌ गाडीतच झोप

रोहित शर्माचे दणक्यात पुनरागमन! ६ चौकार, ७ षटकार... सर्वाधिक ८४ धावा, तरीही मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार रायन रिकल्टनला; असं का?

SCROLL FOR NEXT