संग्रहीत छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

या कारणामुळे विद्यार्थी 'टिली-मिली' कार्यक्रमापासून वंचित...  

संदीप लांडगे

औरंगाबाद ः कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, म्हणून शिक्षण विभागाच्या वतीने दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर इयत्ता पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी टिलीमिली ही दैनंदिन मालिका दाखवण्यात येत आहे.
मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या मालिकेचे भाग पाहण्यास लोडशेडींगचा अडथळा येत आहे.

पावसाळा सुरु असल्यामुळे कधीही वीज गायब होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना या मालिकेचा एकही भाग पाहायला मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी `सकाळ’ शी बोलताना सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. या शाळा कधी उघडतील याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. मुले शैक्षणिक प्रवाहाच्या बाहेर जावू नये किंवा मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी शासनाकडून विविध पद्धतीने प्रयत्न केले जात आहे. यासाठी सर्व शाळांना ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. 

मात्र, शहरी व ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल, इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. म्हणून महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन या स्वयंसेवी संस्थेने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी २० जुलैपासून ‘टिलीमिली’ नावाची मालिका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सुरु केली. सकाळी साडेसात वाजल्यापासून दुपारी साडेबारापर्यंत ही मालिका पहिली ते आठवीच्या विद्यार्थांसाठी सुरु आहे. यासाठी खास वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. शहरासह ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थांना या मालिकेचा लाभ घेता यावा, हा या मालिकेचा उद्देश होता. परंतु, ग्रामीण भागात दोन ते चार तासांचे दररोज लोडशेडींग सुरु आहे. तसेच पावसाळा सुरु असल्यामुळे विजेचा सतत लपंडाव सुरु असल्याने मुलांना टिलीमिली कार्यक्रमाचा काहीच फायदा होत नसल्याचे समोर आले आहे. 


मी इयत्ता सातवीला आहे. आमच्या शिक्षकांनी सह्याद्री वाहिनीवर सुरु असलेला टिलीमिली कार्यक्रम पाहण्याची सूचना दिली आहे. मात्र, आमच्या गावात दररोज चार तासांचे लोडशेडींग असते. त्यामुळे सकाळी सात वाजताच लाईट जाते. त्यामुळे टिलीमिली हा कार्यक्रम बघता येत नाही. तसेच शाळेकडून ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे, पण सध्या मोबाईलचं रिचार्ज संपल आहे. 
- अजिनाथ शिंदे (विद्यार्थी, इयत्ता सातवी) 
-- 
मुलांच्या शाळा कधी सुरु होतील याबाबत अनिश्‍चितता आहे. त्यामुळे शासनाकडून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर टिलीमिली हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु आहे. पण, ग्रामीण भागात लोडशेडींग, पावसाळा सुरु असल्यामुळे कधीही विजेचा लपंडाव सुरु असतो. त्यामुळे मुलांना हा कार्यक्रम पाहता येत नाही. ग्रामीण भागातील लोडशेडींग शासनाने बंद करावे. 
- देवेंद्र साबळे ( पालक) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

Arshdeep Singh Girlfriend: अर्शदीप सिंगची गर्लफ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री? एका टॅटूमुळे समोर आलं मिस्ट्री गर्लचं रहस्य, Viral Post

‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना रखडली, दीड हजार मुलींचे भवितव्य नावाच्या वादात

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील साबळेवाडी, शिंदेवाडी, खुपिरे परिसरात २४ शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबलची चोरी

कतरिनाच्या गाण्यावर गौतमीचा भन्नाट डान्स, एन्ट्री स्टेप पाहून नेटकरी थक्क, Viral Video

SCROLL FOR NEXT