भाजीपाला.jpg
भाजीपाला.jpg 
छत्रपती संभाजीनगर

टोमॅटो, शेवगा खातोय भाव !

प्रकाश बनकर

औरंगाबाद : शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे बाजार समितीत येणाऱ्या भाजी पाल्याची आवक कमी झाल्यामुळे किरकोळ विक्रीत भाजीपाल्याचे दर आणखी वाढले आहेत. टोमॅटो ८० रुपये किलोने विक्री होत आहेत. टोमॅटोचा जिल्ह्यात तुटवडा असल्यामुळे हे दर वाढले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजार समिती भाजीपाल्याची आवक घटली असल्याचे बाजार समितीतर्फे सांगण्यात आले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
बाजार समितीत गुरुवारी (ता.२४) टोमॅटोची १९५ क्विटंल आवक झाली. कांदा १११३ रुपये क्विटंल आवक झाली असून, कांदा हा किरकोळ बाजारात ३० ते ३५ रुपये प्रमाणे किलोने विक्री झाला. ७०० क्विंटल बटाट्याची आवक बाजार समितीत झाली. १६ हजार ५०० नग कोथिंबीर, बारा हजार नग मेथी, १३ हजार नग पालक, शेवगा २० क्विंटल, वांगे ३७ क्विंटल, हिरवी मिरची ८५ क्विंटल आवक झाली. पंधरा दिवसांपूर्वी हीच आवक दुप्पट होती. कडधान्यात बाजारी ८१ क्विंटल आवक गहू ४२ क्विंटल आवक झाली असल्याचे बाजार समितीतर्फे सांगण्यात येत आहेत. 

किरकोळ बाजारात

(बाजार समिती आणि हातगाडीवर विक्री होणारा भाजीपाला) 

  • कोथिंबीर--- १५ रुपये जुडी 
  • मेथी--- १० रुपये जुडी 
  • पालक--१० रुपये जुडी 
  • शेफू-- १० रुपये जुडी 
  • टोमॅटो--८० रुपये किलो 
  • बटाटे---५० रुपये किलो 
  • वांगे--४० रुपये किलो 
  • शेंवगा -- ८० रुपये किलो 
  • मिरची---८० रुपये किलो 
  • भोपळा-- ३० रुपये किलो 
  • लिंबू --- ३० ते ३५ रुपये किलो 
  • भेडी----४० रुपये किलो 
  • चवळी शेंग-- ३० रुपये किलो 
  • आले----६० रुपये किलो 
  • कांदा--- ३० ते ३५ रुपये किलो 
  • कारली-- २५ ते ३० रुपये किलो 
  • फ्लॉवर-- २५ रुपये किलो 
  • कोबी---२० ते २५ रुपये किलो 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT