Vegetables Sell At Ambedkar Chowk, Social Distancing Not Follows  
छत्रपती संभाजीनगर

आंबेडकर चौकात भरला बाजार ; सोशल डिस्टन्सचा फज्जा

प्रकाश बनकर

औरंगाबाद: बाजार समितीतील भाजी मंडाईतील किरकोळ विक्री बंद करण्यात आल्याने आंबेडकर चौक ते रिलायन्स पेट्रोल पंप दरम्यानच्या मंगळवारी(ता.३१) सर्व्हिस रोडवर हा बाजार भरविण्यात आला.गर्दी टाळण्यसाठी हा निर्णय घेण्यात आला.मात्र, या ठिकाणी सोशल डिस्टन (पाच मीटर) नियमाचा येथे पुर्णपणे फज्जा उडाला. खरेदीसाठी येथे मोठी गर्दी झाली. ठिकाणीही बाजार समितीप्रमाणेच महापालिकाचे प्रयत्न फेल गेला. या किरकोळ विक्रेत्यांना वेगवेगळ्या भागात विक्रीसाठी पाठवा एका ठिकाणी बसवु नका अशी मागणी करण्यात येत आहेत.

किरकोळ विक्रेत्यासाठी महानगरपालिकेतर्फे सोशल डिस्टन्स असावे यासाठी सोमवारी(ता.३०) आंबेडकर चौक ते रिलायन्स पेट्रोल पंप (गरवारे कंपनी समोर) दरम्यान सर्व्हिस रोडवर मार्किंग करण्यात आली होती, त्यानुसार भाजीपाला विक्री त्यांनी नियम पाळावे असे होते. मात्र रात्री झालेल्या पावसामुळे ही मार्किंग मिटली. आंबेडकर चौकापासून रिलायन्स पेट्रोल पंप पर्यंत बसलेल्या भाजीपाला विक्री त्यांनी पाच मीटर चे अंतर पाळले नाही. केवळ पाच ते दहा टक्केच विक्रेत्यांनी हे नियम पाळले. यासह ग्राहकांनीही रुमाल, मास्क न लावता भाजी खरेदीसाठी याठिकाणी आले होते. यामुळे ज्या उद्देशाने भाजी ही सुविधा फोल ठरली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अनेकांना पोलिसांचा प्रसाद
आंबेडकर चौकात असलेल्या किरकोळ भाजीपाला मार्केटमध्ये अनेक ग्राहकांनी मागणी व सुरक्षा साधने न आणल्याने पोलिसांचे त्यांना दंडुके खावे लागले. पोलीस व महापालिका प्रशासनातर्फे वारंवार सांगूनही ग्राहक सुरक्षा साधनाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्यांना हा पोलिसांचा प्रसाद खावा लागला.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळी सहा ते साडेनऊ दरम्यान विक्री
आंबेडकर चौकातील नवीन सर्विस रोड वरील भाजी विक्रीसाठी सकाळी सहा ते साडे नऊ या वेळेत विक्री करण्यात येणार आहे त्यानंतर या भाजीपाला विक्री करणाऱ्यांना हातगाडी च्या माध्यमातून कॉलनीत भाजीपाला विक्री करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेल मिळणार; पण ‘स्टोव्ह’ कुठून आणणार?; अनेक कुटुंबांचा प्रश्न ः एकच सिलिंडर असलेल्या गृहिणींपुढे अडचणींचा भडका

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर ‘ईव्ही हब’ बनणार; अतुल सावे : मराठवाड्याच्या विकासावर परिषदेत मंथन

IPL 2026: RCB घरच्या मैदानात SRH ला भिडणार, पण पहिल्याच सामन्याला हुकमी एक्के मुकणार; जाणून घ्या संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये बिद्रीतील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान प्रकरण उघड

SCROLL FOR NEXT