Chhatrapati Sambhajinagar Fire news  Esakal
छत्रपती संभाजीनगर

वाळूज MIDCमध्ये अग्नीतांडव! जेवण करून झोपलो अन्... बाहेर सर्वत्र धूर; दुर्घटनेतून बचावलेल्या कामगाराने सांगितली आपबिती

Chhatrapati Sambhajinagar Fire news : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली आहे. येथील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीत भीषण आग लागली या घटनेमध्ये कंपनीतील 6 कामगारांचा झोपेत असतानाच होरपळून मृत्यू झाला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Chhatrapati Sambhajinagar Fire news : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत (Waluj Industrial Estate) मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली आहे. येथील हँडग्लोज (Handgloves) बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीत (Sunshine Enterprise Company) भीषण आग लागली या घटनेमध्ये कंपनीतील 6 कामगारांचा झोपेत असतानाच होरपळून मृत्यू झाला आहे.

तर, कंपनीतील चार कामगारांनी बाहेर पडून आपला कसाबसा जीव वाचवला आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. वाळूज औद्योगिक परिसरात हँडग्लोज बनवणारी सनशाईन एंटरप्राईज कंपनी आहे. या कंपनीला मध्यरात्री अचानक आग लागली.

या कंपनीमध्येच हे कामगार राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेतून बचावलेल्या एका कामगाराने या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, रात्री आम्ही जेवण करून झोपलो होतो. रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास कोणीतरी आले आणि सांगितले की, कंपनीत आग लागली आहे. मी माझ्या रूमच्या बाहेर आलो, तर सर्वत्र धूर पसरला होता. बाहेर काहीच दिसत नव्हते. मी तेथून बाहेर उडी मारली. रात्री बाहेरच्या गेटला कुलूप लावले होते. काही जण गेटच्यावरून उड्या मारून बाहेर पडलो. बाकी काहींनी मिळेल तिकडून उड्या टाकल्या. ६ लोक आतमध्ये अडकले, त्यांचा मृत्यू झाला.

सनशाइन इंटरप्राईजेस या कंपनीत रबरी हातमोजे बनवण्याचे काम केले जाते. १५ कामगारांसह एक महिला व दोन लहान मुले असे एकूण १८ जण येथे काम करतात. या कंपनीत काम करणारे बहुतांश कामगार बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील मिर्झापूर, पंचायत दलोकर या गावाचे रहिवासी आहेत. शिवाय एकजण पश्चिम बंगाल व शेजारच्या गावातील आहे.

अग्नीतांडवात मृत झालेल्यांमध्ये एका ज्येष्ठ कामगाराचा समावेश आहे. त्याशिवाय एका अठरा वर्षीय युवकाचाही समावेश आहे. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुश्ताक शेख (वय ६५), कौशर शेख (३२), इक्बाल शेख (१८), ककनजी (५५), रियाजभाई (३२), मरगुस शेख (३३) या कामगारांचा मृत्यू झाला आहे.

काही कामगारांचा धूरात गुदमरून मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. कामगार झोपेत असताना ही आगीची घटना घडली आहे. काही जणांनी छतावरून झाडाच्या सहाय्याने उड्या मारल्या. आग भडकल्याने सहा कामगार आतच अडकले होते.

आगीची माहिती मिळाल्यानंतर वाळूज अग्निशमन दलाचे दोन बंब, बजाज ऑटो कंपनीचा एक, महापालिकेचे दोन व चिकलठाणा अग्निशमन दलाचा एक अशा ६ बंबांसह वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. सुरूवातीला आतमध्ये अडकून पडलेल्या सहा कामगारांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल

Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

SCROLL FOR NEXT