Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

धक्कादायक : सिल्लोडला विहिरीत उडी घेऊन तलाठ्याची आत्महत्या..!

सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड : शेतकरी कर्जबाजारी झाला म्हणून आत्महत्या करीत असल्याचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. मात्र, शनिवारी दुपारी सिल्लोड येथे चक्क एका तरुण तलाठ्यानेच विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तलाठ्याने आत्महत्या का केली असेल या बाबत उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. 

अरे बाप रे ! मोरांना विष अन् नीलगायी, रानडुकरांना देतात शॉक ! 

शहरालगतच्या परिसरात असलेल्या विहिरीत उडी घेऊन तलाठी राहुल अशोक पांडे (वय ४०) यांनी शनिवारी (ता. सहा) दुपारी दोनच्या सुमारास आत्महत्या केली. शहरातील शिक्षक कॉलनी परिसरालगतच्या सपकाळवाडी येथील एका विहिरीमध्ये मृतदेह आढळून आल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी तत्काळ सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेवूून माहिती घेतली. 
अन्वी (ता.सिल्लोड) येथील सजावर कार्यरत तलाठी राहुल अशोक पांडे यांनी दुपारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.

महसूल प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तलाठी राहुल पांडे यांनी आत्महत्या का केली आहे. याचे कारण काय असावे याबाबत तपासणी केली जात आहे. या घटनेनंतर उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. तर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेतीच्या वादातून एकाचा मृत्यू 
आडुळ/चित्तेपिपंळगाव : शेतीच्या वादातून भावकीत झालेल्या वादाचे तुंबळ हाणामारीत रुपांतर झाल्याने गंभीर जखमी झालेल्या एका शेतकरयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना चिचोंली (ता .औरंगाबाद) येथे शुक्रवार (ता.५) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. मयत तरुण शेतकरयाचे नाव कुष्णा रामराव वाघ (वय ३८) वर्षे असे आहे. चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुष्णा रामराव वाघ या शेतकर्‍याची औरंगाबाद तालुक्यातील चिचोंली शिवारात गट नंबर २५ मध्ये शेती असुन त्यांच्या भावकीतीलच त्याचे सख्खे चुलत भाऊ असलेले उध्दव लक्ष्मण वाघ व अंकुश लक्ष्मण वाघ व चुलता लक्ष्मण वाघ याची शेती शेजारीच आहे.

 कुष्णा वाघ व लक्ष्मण वाघ यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शेतीचा वाद सुरु आहे या वादाची आज शाब्दीक चकमकीने सुरुवात होऊन त्याचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले.लक्ष्मण वाघ, उध्दव वाघ व अंकुश वाघ यांनी कुष्णा वाघ याला कुराडी व दांड्याने जबर मारहाण केली होती. या मारहाणीत तो गंभीररित्या जखमी होवुन जागेवर कोसळला. यानंतर संशयित आरोपींनी कुष्णाला गंभीररीत्या अवस्थेत पाहुन घटनास्थळावरून पळ काढला, गंभीर जखमी झालेल्या कुष्णाला तात्काळ पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: जगात पुन्हा युद्धाची चाहूल? अमेरिकेवर विश्वास नाही; युद्ध भडकू शकतं, इराणचा कडक इशारा, चिंता वाढली!

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरला नवा संघ मिळाला... मुळ किंमतीच्या पाचपट रक्कम; शिवम दुबेसह आता धुमाकूळ घालणार भाई...

Multibagger Stock: लखपतींचे करोडपती बनवणारा स्टॉक! फक्त ₹1 लाखाचे झाले तब्बल ₹1.30 कोटी

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

SCROLL FOR NEXT