Aurangabad Accident News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad|धक्कादायक ! तेराव्याचा कार्यक्रम उरकून परतणाऱ्या तरूणाचा मृत्यू

तरुणाच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : पाटेगाव (ता.पैठण) येथून तेराव्याचा कार्यक्रम उरकून दुचाकीवरुन घरी परतणाऱ्या तरुणास वाहनाने जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना पाचोड -अंबड राज्य महामार्गावर सुयोग मंगल कार्यालयाजवळ सोमवारी (ता.२१) रात्री घडली. ज्ञानेश्वर दामोधर कोटंबे (वय २७) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. यासंबंधी अधिक माहिती अशी, नागोण्याचीवाडी (ता.अंबड) येथील ज्ञानेश्वर कोटंबे हा तरूण त्याच्या मेहुण्याच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पाटेगाव (ता. पैठण) येथे गेला होता. कार्यक्रम आटोपून रात्री तो दुचाकीवरून आपल्या गावी नागोण्याचीवाडीकडे निघाला. (Youth Died In Road Accident In Paithan Taluka Of Aurangabad)

भरधाव दुचाकीने गावी येत असताना त्याच्या दुचाकीस पाचोडपासुन जवळ असलेल्या सुयोग मंगल कार्यलयासमोर पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर कोटंबे हा दुचाकीवरून रस्त्याखाली फेकला गेला. यात त्यास गंभीर मार लागला. दरम्यान हा अपघात होताच उपस्थित स्थानिक नागरिकांनी तातडीने ज्ञानेश्वर कोटंबे यास पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. चौरे यांनी ज्ञानेश्वर कोटंबे यास तपासून मृत घोषीत केले.

या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी प्रशांत नांदवे,रविद्र आंबेकर आदी करीत आहे. ज्ञानेश्वर कोटंबे हा पाचोड येथील एका दुकानावर कामांस होता. त्याच्या अचानक अपघाताने झालेल्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT