Aurangabad Crime News Sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत गुंडांचा धुमाकुळ; तरुणावर जीवघेणा हल्ला, डोक्याला पडले ७० टाके

स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या तरुणावर फायटर आणि तलवारीने हल्ला

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटना घडत आहेत. कश्यप गँगने रेणुकानगरमध्ये स्पर्धा परीक्षाची (Competitive Exams) तयारी करणाऱ्या तरुणावर फायटर आणि तलवारीने हल्ला केला. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. शुभम विनायक मनगटे (वय २४, रा.साईनगर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या डोक्याला जवळपास ७० टाके पडले आहेत. या प्रकरणी पाच आरोपींना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी (ता.पाच) रात्री दहा वाजता औरंगाबाद येथे कश्यप गँगचे राजू पठाडे, यश पाखरे, शुभम मोरे, अतिश मोरे, शेख बादशाह शेख बाबा, निलेश धस, पिन्या खडके यांनी शुभम याला शिवीगाळ केली. (Youth Injured In Kashyap Gang Attacks In Aurangabad)

त्यानंतर फायटर व तलवारीने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याची स्थिती नाजूक आहे.

कारण काय ?

आरोपींनी तरुण शुभमच्या किराणा दुकानातून तंबाखू, गुटखा मोफत देण्याच मागणी दहा दिवसांपूर्वी केली होती. त्यास नकार देताच त्यांनी बघून घेऊ अशी धमकी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tivsa News : परंपरागत गाई-म्हशीच्या खेळाला गालबोट, दगडफेक आणि रोषाचे वातावरण; तिवसा येथे पोलिसांचा बळाचा वापर

Viral Video : पठ्ठ्याने मंत्रानेच फोडले फटाके, पाहून लोक झाले आश्चर्यचकित, अजब व्हिडिओ होतोय व्हायरल

MNS Deepotsav Controversy : ‘’दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत, हे दाखवण्यापर्यंत सरकार...’’ ; मनसेचा आरोप!

RBI Reforms: मोठी बातमी! बँकिंग कायदे बदलणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच मोठी घोषणा करणार, नवीन तरतुदी काय असणार?

ZIM vs AFG : झिम्बाब्वेचा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय! Blessing Muzarabani ने मोडला मोहम्मद सिराजचा विक्रम

SCROLL FOR NEXT