Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

फायनान्स कंपनीने नेली दुचाकी ओढून, तरुणाने घेतले पेटवून 

सकाळ वृत्तसेवा

वाळूज (जि. औरंगाबाद) : कोण कोणत्या मनस्थितीत कोणत्या थराला जाईल, हे सांगता येणार नाही. कर्जबाजारी लोक आत्महत्येचा मार्ग पत्करतात, तसाच पण काहीसा भयंकर प्रकार औरंगाबाद शहरात उघडकीस आला आहे. 

फायनान्सवर घेतलेली कर्जाचे हप्ते थकल्यामुळे कंपनीने ओढून नेली. यामुळे एका २६ वर्षीय तरुणाने रॉकेल ओतून पेटवून घेतले. ही घटना वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साजापूर येथे मंगळवारी (ता. १८) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

अविनाश रावसाहेब डोखळे (वय २६) हा साजापूर येथे कुटुंबासह राहतो. तो वाळूज औद्योगिक वसाहतीत एका खासगी कंपनीत काम करतो. काही दिवसांपूर्वी त्याने एल अ‍ॅण्ड टी फायनान्स कंपनीचे कर्ज काढून दुचाकी घेतली.

त्याचे हप्ते थकल्यामुळे फायनान्स कंपनीच्या दोघांनी सोमवारी दुचाकी नेली. मंगळवारी डोखळे हा सकाळी फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये पैसे भरण्यासाठी गेला असता पूर्ण पैसे भरल्याशिवाय दुचाकी मिळणार नाही, असे त्यास सांगितले.

त्यामुळे त्याने नैराश्याच्या भरात घरी येऊन सायंकाळी सहाच्या सुमारास पेटवून घेतले. यात तो ४० टक्के भाजला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद नसल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

SCROLL FOR NEXT