ausa 
मराठवाडा

विकासकामात मराठा समाजाला झुकते माप; नगराध्यक्षांचे सोशल इंजिनिअरिंग

जलील पठाण

औसा (लातूर): नगरपालिकेची निवडणूक यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीला समोर ठेऊन नगराध्यक्ष अफसर शेख यांनी त्यांच्याकडे नेहमी मतात पाठ फिरविणाऱ्या समाजाकडे लक्ष दिले असून विकासकामाच्या नावाखाली त्यांनी मराठा, विरशैव, व ईतर समाजाकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

यापुर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत शेख यांनी मराठा समाजाला आपल्याकडे खेचण्याची चांगली खेळी केली असुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सर्वसोयीयुक्त असे प्रदर्शन हॉल बांधण्याची घोषणा केली आहे. मुळात भाजपा आणि सेनेच्या पाठीमागे उभा राहणारा मराठा समाज या निमित्ताने राष्ट्रवादीच्या कक्षेत आणण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. त्याच बरोबर विरशैव आणि ककय्या समाजाच्या स्मशानभूमीचा भावनिक प्रश्नही त्यांनी हाताळत या स्माशानभुमीचे काम सुरु केल्याने नगराध्यक्षांनी निवडणुकीपुढे खेळलेली खेळी त्यांना कितपत लाभदायी ठरते हे येणारा काळच ठरवेल.

मात्र एकीकडे भाजपाचे आमदार त्यात पालकमंत्र्यांशी त्यांनी घेतलेला उघड पंगा आणि गेल्या पाच वर्षाच्या त्यांच्या कार्यावर नाराज असलेला खुद्द काही मुस्लिम समाज बघितला तर त्यांनी चललेली ही मोठी राजकीय खेळी मानली जात आहे. औसा नगरपालिकेत राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक व नगराध्यक्ष असे 13 सदस्य आहेत. तर त्यापाठोपाठ भाजपाचे 6 तर कॉंग्रेसचे केवळ दोनच सदस्य आहेत. सध्याच्या सत्तेत राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत असल्याने आनेक निर्णय नगराध्यक्ष डॉ. शेख यांनी उचलून धरले आहेत.

मागील चार वर्षांची त्यांची राजकीय कारकीर्द तशी वादळीच ठरली. पहिल्यांदा आमदार अभिमन्यू पवारांनी त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईसाठी थेट मंत्रालयात वजन वापरले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी आघाडीचा घटक असलेल्या कॉंग्रेस आमदारांचा विरोध केला. अपात्रतेच्या कारवाईनंतर पुलाखालुन खूप पाणी आहे. त्यातच मागे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांची नेमणूक करताना नगराध्यक्षांच्या यादीला आडगळीला टाकून दिल्याने त्यांनी थेट पालकमंत्र्याच्या विरोधातच दंड थोपटत त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत दाखवू अशी टिपण्णी केली.

त्यांच्या कामावर नेहमी त्यांच्या पाठीमागे असलेला कांही मुस्लिम समाजही नाराज असल्याचे दिसुन येते. त्यामुळे त्यांनी आता मराठा, विरशैव, ककय्या व इतर समाजावर आपले लक्ष केंद्रीत करीत त्यांच्यासाठी विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यांच्या विरोधात तिसऱ्या आघाडीनेही रणशिंग फुंकल्याने सगळीकडून घेरलेले धुर्त नगराध्यक्ष हे थेट विरोधकांच्या कळपातीलच मतदारांना गोंजारत असल्याचे त्यांच्या कामावरुन दिसुन येते. याचाच भाग म्हणुन आगोदर वारकरी भवन, नंतर मुक्तेश्वर मंदीरासमोरील तलाव संवर्धन, त्यानंतर आता मराठा भवनाची घोषणा यामुळे विरोधाकांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा शिरकाव झाल्याचे दिसुन येते.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: तापमान आणखी वाढणार; घाटमाथ्‍यावर आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता,कसे असेल हवामान? जाणून घ्या

Swachh Survekshan:आनंदाची बातमी! 'स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत' कऱ्हाड देशात अव्वल; दिल्लीत हाेणार गौरव, सलग सहाव्यांदा पुरस्कार पटकावला

Pune News: वाकडमध्ये फ्लॅटसाठी विवाहितेचा छळ; सासरच्या व्यक्तींची शिक्षा कायम

मोठी बातमी! आता विद्यार्थी अन् प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक; वर्गातच असणार बायोमेट्रिकची मशिन; परीक्षेसाठी ७५ टक्के उपस्थिती आवश्यक

Beet Sprouts Chilla: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि हटके हवाय? मग हा बीट-स्प्राऊट्स चिला एकदा ट्राय कराच!

SCROLL FOR NEXT