मराठवाडा

हिंंगोलीत कोरोना लसीकरणाच्या जनजागृतीसाठी परिवर्तन एक्सप्रेस सज्ज

राजेश दारव्हेकर

दुसऱ्या टप्प्यात लसीकरण किटकजन्य साथरोग आजाराची जनजागृती करण्यासाठी परिवर्तन एक्सप्रेस सज्ज झाली आहे.

हिंगोली : कोरोना (Corona)महामारीच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी पहिल्या टप्प्यात परिवर्तन एक्सप्रेस द्वारे जनजागृती करण्यात आली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात लसीकरण किटकजन्य साथरोग आजाराची जनजागृती करण्यासाठी परिवर्तन एक्सप्रेस (parivartan express) सज्ज झाली आहे. (awareness on corona vaccination in hingoli has been spread through parivartan express)

दरम्यान, जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच मुत्युदर कमी करण्यासाठी "माझे कुटुंब माझी जबाबदारी' कोविड महाराष्ट्र मुक्त ही मोहिम दोन टप्प्यात राबविण्यात येणार असून पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा पातळीवर कुटूंबाच्या घरोघरी जाऊन ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान सर्व्हेक्षण व तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.

जिल्ह्यात एकूण बारा लाख सतरा हजार ४५८ लोकसंख्या असून २ लाख ३६ हजार ७१६ कुटुंब संख्या आहे. एवढ्या कुटूंबाची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यामध्ये ग्रामीण भागात एक लाख ९३ हजार ७३७ कुटुंब संख्या असून, शहरी भागात ४२ हजार ९७९ एवढी संख्या आहे. या करीता जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फेत ५९५ पथके स्थापन करण्यात आली होती, त्यामध्ये १७८५ कर्मचारी होते. संदर्भ सेवेसाठी ३७ डॉक्टर, २९ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या. पथकातील कर्मचारी यांना टि शर्ट, अँप्रोन, टोपी, बॅच व प्रसिद्धी साहित्य देण्यात आले. या मोहिमेची आरोग्य विभागामार्फेत जिल्ह्यातील ग्रामीण पातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.

मीच माझा रक्षक ही मोहिम जिल्ह्यात राबविण्यात आली व त्यानंतर मी जबाबदार ही मोहिम राबविण्यात येत आहे. व या सर्व मोहिमाची जिल्ह्यात कोरोना एक्सप्रेस द्वारे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच सध्या कोरोना प्रतिबंधित लसीकरणाची जनजागृती जिल्ह्यातील गावोगावी सुरु आहे. या लसीकरण मोहिमेत ३० वर्षावरील नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करुन घ्यावे व कोविड या विषाणुजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हे एकच उपाय आहे. गावोगावी जाऊन आरोग्य शिक्षण दिले जात आहे .सध्या पारेषण काळ सुरु झाला असून जिल्ह्यातील नागरिकांनी किटकजन्य आजाराबाबत काळजी घ्यावी डेंग्यु, हिवताप अशा किटकजन्य आजाराची साथरोग उदभवू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घराजवळील परिसर, साचलेल्या नाल्या वाहत्या करणे, साचलेल्या डबक्यात टायर्स ,नारळाच्या करवंट्या, फुलदानी इत्यादी मध्ये जळके ऑईल रॉकेल टाकणे.

आठवड्यातुन एक दिवस शनिवार हा 'कोरडा दिवस' म्हणून पाळण्यात यावा, या दिवशी घरातील सर्व सांडपाण्याची भांडे रिकामी करुन पुसून ठेवावी व नंतर पाणी भरावे, मच्छर दाणीचा वापर करणे, मच्छरसाठी अगरबत्ती कॉईल वापरणे, इ. काळजी घ्यावी, याबाबत करोना परिवर्तन एक्सप्रेसद्वारे जनजागृती करणे सुरु आहे. यामध्ये माहितीपत्रिका देखील वाटप करण्यात येत आहे. मास्क नेहमी तोंडाला बांधून सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. (awareness on corona vaccination in hingoli has been spread through parivartan express)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT