mla kuche.jpg
mla kuche.jpg 
मराठवाडा

बदनापूरचे भाजप आमदार कुचे यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी औरंगाबादेत दाखल.

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदार संघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना औरंगाबादेतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आमदार नारायण कुचे यांनी केले. 

नारायण कुचे यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. कुचे यांच्या उपस्थितीत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते अंबड येथील डेडीकेटेड कोवीड-19 हेल्थ सेंटरचे रविवारी उद्घाटन करण्यात आले होते. त्यामुळे दरम्यानच्या काळात जे कुणी आपल्या संपर्कात आले असतील, त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व काळजी घ्यावी, असे आवाहन देखील कुचे यांनी केले आहे.

कोरोना संकट काळात राजकीय नेते, लोकप्रतिनिधी पुढाऱ्यांना संसर्ग झाल्याचे दिसून आले होते. अगदी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री ते आमदार, खासदार या सगळ्यांनाच कोरोनाने आपल्या कव्हेत घेतले. अनेकांनी कोरोनावर मात करत नव्याने आपल्या कामाला सुरूवात केली, तर अजूनही नेते, लोकप्रतिनिंधींना संसर्ग होण्याचे प्रमाण सुरूच आहे. 

भाजप आमदार नारायण कुचे यांनी मध्यंतरीच्या काळात लोकांना अन्नधान्य, दैनंदिन वस्तूंचे वाटप केले. त्यानंतर पक्ष, संघटनेच्या बैठका, आंदोलनात देखील ते सहभागी झाले होते. कोरोना प्रादुर्भाव वाढलेला असतांना योग्य काळजी घेत त्यांनी आपला बचाव केला होता. पण नुकताच त्यांना त्रास आणि लक्षणे जाणवायला लागली. तेव्हा त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: यश दयालने गुजरातला दिला दुहेरी दणका! राशिद खानपाठोपाठ तेवतियाही बाद

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT