Balu Mhetre, a farmer from Hayatnagar in Wasmat taluka, has increased his income by cultivating watermelon..jpg 
मराठवाडा

कलिंगड लागवडीच्या उत्पन्नातून साधला आर्थिक आधार; हयातनगर येथील शेतकऱ्याचा उपक्रम

शंकर राहटीकर

हयातनगर (हिंगोली) : वसमत तालुक्यातील हयातनगर येथील युवा शेतकऱ्याने कलिंगड लागवडीच्या उत्पन्नातून आर्थिक स्त्रोत निर्माण करुन कुटुंबाच्या उत्पन्नात भर पाडली आहे. यामुळे त्यांना चांगला आधार मिळाला आहे. 

हयातनगर येथील बाळू म्हेत्रे‌‌ हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांना तीन ते चार एकर जमीन आहे. त्यांच्याकडे बोअरवेल असून त्याला मुबलक पाणी देखील आहे. ते पारंपारिक पद्धतीने पीके घेतात. यात सोयाबीन, तूर, कापूस, हरभरा, गहू यासह इतरही पिकांचा समावेश असतो. 

त्यांनी यावर्षी नवीन प्रयोग म्हणून कलिंगड पिकांची शास्त्रशुध्द पध्दतीने ४० गुंठ्यांत लागवड केली व त्याची व्यवस्थित देखभाल व पाण्याचे योग्य नियोजन करून त्यांनी कलिंगड पिक घेतले. योग्य नियोजनामुळे त्यांना चांगले उत्पन्न झाले. यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला व त्यांनी आतापर्यंत जवळपास २९ टन टरबूज पिकवले आहे. त्यांनी विविध बाजारासह वसमत, पुर्णा येथे त्याची विक्री केली आहे.

त्यातून सर्व‌ खर्च वजा जाता त्यांना निव्वळ नफा ४० हजार रुपयाचा झाला आहे. यामुळे कुटुंबाला आर्थिक हातभार मिळाला आहे. यासाठी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मोठी मदत केल्याने त्यांना उत्पन्न मिळाले आहे. शेतीत पारंपरिक पद्धतीने पिकाबरोबर नवीन प्रयोग केल्यास यश निश्चित मिळत असल्याचे त्यांनी अनुभवातून सांगितले.

नोव्हेंबरमध्ये ४० गुंठ्यांत कलिंगडची लागवड केली. लागवड ते काढणी तसेच वाहतूक खर्च वगळता ४० हजार रुपये निव्वळ नफा झाला आहे.
- बाळु म्हेत्रे, शेतकरी  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

January Bank Holiday : जानेवारीत तब्बल १६ दिवस बँका बंद! व्यवहार करण्यापूर्वी राज्यातील बँक सुट्ट्यांची यादी एकदा पाहा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये भररस्त्यावर तरुणांची गुंडागर्दी; दगडफेक व काठ्यांनी हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

New Year Party Menu 2026: 31 डिसेंबर अन् 1 जानेवारीसाठी 'असा' बनवा परफेक्ट मेनू, चवीने जिंकाल सगळ्यांची मनं

Nashik Kumbh Mela : सिंहस्थासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर सजणार! आध्यात्मिक वारसा आणि आधुनिकतेचा होणार संगम

Fox Attack in Kolhapur : भरवस्तीत कोल्ह्याचा धुमाकूळ; नागरिकांवर हल्ला, थरारनाट्यानंतर पकडलेल्या कोल्ह्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT