Aurangabad news
Aurangabad news  
मराठवाडा

'या' विद्यापीठातील मुलींना धमकी : मुलांशी बोलल्यास पालकांना फोटो पाठवू 

अतुल पाटील

औरंगाबाद : "वसतिगृहाच्या गेटवर मुलांशी गप्पा मारताना दिसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसे पत्रही पालकांना पाठविण्यात येईल.' अशी सूचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाच्या गेटवर चिकटवल्याने एकच गोंधळ उडाला होता. विद्यार्थी संघटनांनी एकजुट दाखवत ती नोटीस फाडून टाकली. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी या प्रकाराची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्यात येईल, असे "सकाळ' ला सांगितले. 

विद्यापीठातील आरोग्य केंद्राजवळील मुलींच्या वसतिगृहाच्या गेटवर निनावी सूचना चिकटवण्यात आली होती. यात म्हटले होते कि, "गेटजवळ उभे राहुन गप्पा मारु नये. जर विद्यार्थिनींना कुणाला नोटस्‌ द्यायच्या असतील तर, सेक्‍युरिटी गार्ड यांच्याकडे नोटस्‌वर नाव लिहून त्यांच्याकडे द्याव्यात, अन्यथा दंडात्मक कारवाई करुन पालकांना पत्र पाठवण्यात येईल.' यानंतर मुली-मुली बोलताना वॉचमन विद्यार्थिनींचे फोटो काढत असल्याचे काही मुलींनी सांगितले.

त्यानंतर शुक्रवारी सकाळी विद्यार्थी संघटनांनी एकत्रित येत ती नोटीस फाडून टाकली आहे. यावर सोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी आवाज उठविला होता. तसेच या प्रकरणाची दखल व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांची भेट घेत कुलगुरुंशी संवाद साधला. 

कुणी चिकटवली ही नोटीस 

मुलींनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले कि, ही नोटीस वॉर्डनच्या सांगण्यावरुन वॉचमननी लावली. मात्र, ही नोटीस काही विद्यार्थ्यांनीच लावली असल्याची दबक्‍या आवाजात चर्चा आहे. ही नोटीस कुणी चिकटवली, ही बाब अद्याप उघड झाली नसून कुलगुरुंनी मात्र, या प्रकाराची चौकशी करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

विद्यार्थिनींचा उपोषणाचा इशारा 

मनुवादी वृत्तीचा मी निषेध करते. विद्यापीठाच्या ठिकाणी अशी वागणुक मिळणे, हे चुकीचेच आहे. ती नोटीस आमचा अपमान करणारी आहे. 
मुलींच्या वसतिगृहातील बाथरुममध्ये साप निघाला. परिसरात लाईट नाही. गवत वाढले. डुक्‍कर फिरतायत. अशा बाबींकडेही लक्ष द्यावे. कुलगुरुंच्या बंगल्यासमोरील वसतिगृहाचे गेट नाही उघडले तर, सोमवारपासून उपोषण करणार असल्याचे विद्यार्थिनी दीक्षा पवार हिने सांगितले. 

मी बाहेरगावी आहे. मात्र तो प्रकार कळाला. चिटकवलेली नोटीस काढून टाकायला लावली आहे. नोटीसवर कोणाचीच सही नव्हती. त्यामुळे याबाबत डीएसडब्ल्यु यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 
- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

हेही वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : 'ईव्हीएम हॅक करतो' म्हणत अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी; एक जण पोलिसांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT