गुन्हा
गुन्हा  
मराठवाडा

बँक मॅनेजरला मारहाण, नंतर अधिकाऱ्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल

दिगंबर देशमुख

सिरसाळा (जि.बीड) : पीककर्जाची (Crop Loan) फाईल मंजूर होत नसल्याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मॅनेजरला (Maharashtra Rural Bank) मारहाण करण्यात आल्याची घटना सिरसाळा येथे मंगळवारी (ता.तीन) दुपारी चारच्या दरम्यान बँकेच्या शाखेत घडली. या प्रकरणी बँकेचे मॅनेजर अशोक वैजनाथ अर्धापूरे यांनी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल (Crime In Beed) करण्यात आला आहे. फिर्यादीत सांगितले की, मंगळवारी दुपारी बँकेच्या शाखेत दररोज प्रमाणे काम करित असताना गावातील रघुनाथ विश्वनाथ देशमुख यांनी शाखेत येऊन पीककर्जाची फाईल मंजूर होत नाही. यावर मॅनेजरने सांगितले ऊस लागवडीचे हमीपत्र फाईलसोबत जोडा तुमची फाईल मंजूर होईल, असे सांगितले असता तुला कशाचे हमीपत्र पाहिजे, असे म्हणून माझा गचुरा धरून गालावर चापटाने मारहाण करत टेबलवरील पॅड फेकून देण्यात आले.

अंगावर पेट्रोल टाकण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत सांगितले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने करित आहेत. दरम्यान या घटनेमुळे बुधवारी (ता.चार) दिवसभर बँकेचे कामकाज बंद असल्याचे दिसून आले. दुसऱ्या एका घटनेत पंचेचाळीस वर्षीय महिलेने पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत सांगितले की, पीककर्ज फाईल मंजूर करण्यासाठी बँकेत रांगेत उभे असताना महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मॅनेजर अशोक अर्धापुरे यांनी तू आतमध्ये का आली नाहीस म्हणून कलम ३५४ नुसार विनयभंग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पिंक मोबाईल पथकाच्या श्रीमती मस्के या करित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT