Beed Ambajogai monsoon First rain
Beed Ambajogai monsoon First rain sakal
मराठवाडा

बीड : अंबाजोगाई शहरात पहिला पाऊस

सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई : शहर परिसरात मंगळवारी दुपारी अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या हंगामातील हा पहिलाच पाऊस. या पावसाने वाण नदीच्या पुलावरून पाणी वाहिले. त्यामुळे तालुक्यातील येल्डा या गावाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. पाणी ओसरेपर्यंत तासभर अनेकांना अडकून राहावे लागले. दरम्यान, केज तालुक्याच्या काही भागात पाऊस झाला.

मृग नक्षत्र सरले तरी तालुक्यात पाऊस नव्हता. साकुड व पोखरी शिवाराचा काही भाग वगळता अद्याप कुठेच पेरण्यांना सुरवात झालेली नाही. आज दुपारी अंबाजोगाई शहर व डोंगरी भागात जोरदार पाऊस झाल्याने, वाण नदी प्रथमच खळाळली. या नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी शहरात आलेल्या दूध व्यावसायिक शेतकऱ्यांना दुपारी गावाकडे परतताना याठिकाणी थांबावे लागते. मागील वर्षी १२ जूनला या नदीला पूर आला होता. त्यावेळीही वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, आजचा पाऊस तालुक्यात सर्वत्र नव्हता.

रस्त्याची मोठी अडचण

अंबाजोगाई- येल्डा रस्ता केवळ १० ते १२ किलोमीटरचा असून दोन वर्षांपासून त्याचे काम अपूर्ण आहे. रस्ता खोदून ठेवलेला आहे. त्यामुळे दुचाकी चालविणेही कठीण झाले आहे. पाऊस झाल्यास चालणेही मुश्कील होईल. संबंधित कंत्राटदाराने काम पूर्ण करावे किंवा तात्पुरत्या उपाययोजना तरी कराव्यात अशी येल्डा ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

हिंगोलीत पाऊस

हिंगोली शहर आणि परिसरात आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान, पेरणीसाठी शेतकऱ्यांना अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या काही भागातही हलका पाऊस झाला.

नांदेडला जोरदार आगमन

नांदेड शहरासह परिसरात रात्री आठच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. शहरातील वजिराबाद, शिवाजीनगर, तरोडा बुद्रूक भागात जुन्या गावात मुसळधार पाऊस झाला. चैतन्यनगर, वाडी, छत्रपती चौक, पावडेवाडी नाका भागातही पाऊस झाला. भोकर तालुक्यात पाऊस जोरदार झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT