Ayushman Bharat scheme sakal
मराठवाडा

बीड : ‘आयुष्यमान भारत’ गरिबांसाठी जीवनसंजीवनी

डॉ. सुरेश साबळे : लाभार्थींना ई कार्डचे वाटप

सकाळ वृत्तसेवा

बीड : तब्बल १२०९ आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया मोफत होत असलेली आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजनेची अधिकाधिक जनजागृती करून अंमलबजावणी करावी. सदर योजना गरीब रुग्णांसाठी जीवन संजीवनी असल्याचे मत प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी व्यक्त केले.

योजनेच्या त्रिशताब्दी निमित्त गुरुवारी (ता. २३) जिल्हा रुग्णालयात या योजनेतील लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरूपात ई कार्डचे वाटप करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, ‘सकाळ’चे बातमीदार दत्ता देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन आंधळकर, महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. अशोक गायकवाड उपस्थित होते. डॉ. साबळे म्हणाले, आता या योजनेची व्याप्ती वाढवली जात आहे. अनेक खासगी रुग्णालयांत देखील या योजनेतून मोफत उपचार व शस्त्रक्रिया होत आहेत. आता जिल्हा रुग्णालयात देखील सांधेरोपण व बदलण्याच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. योजनेतून उपचार घेताना रुग्णांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण करावे.

प्रास्ताविक डॉ. अशोक गायकवाड यांनी केले. यावेळी श्रीराम राठोड, संदीप आगलावे, डॉ. गावडे, प्रतीक्षा गंगाधरे, अमोल देवडकर, शिवाजी करपे, संदीप राठोड, अनिल राठोड, अमित पायगुडे, रमेश राठोड, अविनाश घोडके, सचिन चव्हाण, बाळासाहेब खळगे, वर्षा दळवी, आयशा अली, आकाश राठोड, अशोक गोरे, ज्ञानेश्वर पवार, मनीषा कुंडलकर, मनीषा वीर, मोहसीन इनामदार, शीतल शिंदे, जयराम आवंधकर, विकास राठोड, माधव खळगे, इम्रान खान, दीनानाथ प्रधान, शुभम वडमारे, सुप्रिया गायकवाड, ज्ञानेश्वर पवार, आकाश जाधव आदींसह लाभार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT