Gevrai News  
मराठवाडा

ऋषीकेशने पाण्यात उडी मारली अन् दुसऱ्या दिवशी मासे पकडण्याच्या जाळ्यातच अडकलेला दिसला

वैजिनाथ जाधव

गेवराई (जि.बीड) : शहरातील संजयनगर भागात राहणारा तरुण पैठणच्या उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. पाण्यात उडी मारल्यानंतर तो वर आलाच नाही. तब्बल दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह आढळून आला. ऋषीकेश दिगंबर शेवाळे (वय १४, रा. संजय नगर, गेवराई) हा मंगळवार (ता.नऊ) सकाळी आपल्या मित्रासोबत पैठणच्या उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेला होता. पोहण्यासाठी त्यांनी कालव्यात उडी मारली त्यानंतर तो मात्र वर आलाच नाही.

यावेळी सोबत असलेल्या मित्रांनी व भावाने पाण्यात शोध घेतला. परंतु उपयोग झाला नाही. या मित्राने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील शेतकरी या ठिकाणी जमा झाले होते. त्यांनी प्रशासनाला माहिती दिल्यानंतर ऋषीकेशचा शोध मंगळवारपासून घेतला जात होता. बुधवारी तहसीलदारांनी देखील या प्रकरणाची माहिती घेतली होती. संजयनगर भागातील मासे पकडणाऱ्या काही लोकांनी कालव्यावर असलेल्या पुलाला मासे पकडण्याचे जाळे लावले होते. गुरुवारी सकाळी ऋषीकेशचा मृतदेह त्याच जाळ्यात अडकलेला आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रूग्णालयात पाठविला.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : महाराष्ट्रात नवे ९६ लाख खोटे मतदार, आगामी निवडणुकांचा निकाल आधीच ठरलाय; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

IND vs AUS 1st ODI : विराट कोहलीचा लाजीरवाणा विक्रम; रोहित शर्मा, सौरव गांगुली झाले असतील खूश, कारण...

Pre-Diwali Beauty: दिवाळीपूर्वी घरच्या घरी गोल्ड फेशियल केल्यास चेहरा दिसेल चमकदार

Latest Marathi News Live Update : सभांना गर्दी मिळते पण मत नाही : राज ठाकरे

IND vs AUS 1st ODI Live: भारतीय संघाला 'तोट्या'त टाकणारा निर्णय! षटकांची संख्या झाली कमी, ऑस्ट्रेलियाचा फायदा...

SCROLL FOR NEXT