Beed Crime Minor girl goes pregnant case has been registered against the youth kej Marathwada  sakal
मराठवाडा

Beed Crime: अल्पवयीन मुलगी पोटात दुखतंय म्हणून रूग्णालयात गेली, साडेपाच महिन्यांची गर्भवती निघाली; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

latest Beed News: या गुन्ह्याचा पुढील तपास पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Latest Kej Crime: पोटात दुखत असल्याने उपचारासाठी खासगी रूग्णालयात गेलेली अल्पवयीन मुलगी ही साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचा प्रकार उघडकीस आला. लग्नाचे आमिष दाखवून मामेभावानेच तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी संबंधित तरूणावर गुरुवारी (ता.१९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने १५ सप्टेंबर रोजी तिची आई तिला केज शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेली होती.

तिथे सोनोग्राफी केल्यानंतर ती अल्पवयीन मुलगी ही साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले.

त्यानंतर तिला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने परत तिची सोनोग्राफी केली असता ती साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, या प्रकारानंतर मुलीच्या मामेभावानेच तिच्यावर लग्न करण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे समोर आले असून पीडितेच्या तक्रारीवरून गुरुवारी केज पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT