Beed Crime News Dhamangaon Ashti
Beed Crime News Dhamangaon Ashti 
मराठवाडा

रोजच्या छेडछाडीला कंटाळून विवाहितेने केला जीवाचा घात, आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी

निसार शेख

कडा (जि.बीड) : आष्टी तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुली तसेच महिलांच्या  छेडछाडीच्या  घटना दिवसेंदिवस वाढत आहे. आपली व आपल्या कुटुंबाची इज्जत जाईल या  भीतीपोटी कोणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत नसल्याने हिरोगीरी करणाऱ्या मजनूंची हिम्मत दिवसेंदिवस वाढत आहे.  रोजच्या छेडछाडीला कंटाळून आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे एका विवाहितीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.११) घडली. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात बुधवारी (ता.२४) गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धामणगांव येथील विनोद साहेबराव घाटविसावे या तरुणाकडून घरा शेजारी राहणाऱ्या प्रदीप साळवे यांच्या कुटुंबातील मनीषा साळवे (वय २५) या विवाहितेची वारंवार छेड काढून त्रास देत होता. तसेच समाजात बदनामी करून  मानसिक त्रास देत होता. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून व समाजात बदनामी होईल या भीतीने मनीषा साळवे या विवाहित तरुणीने गुरुवारी (ता.११) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी मृत विवाहितेचा भाऊ विकास आबासाहेब मकासरे याच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलिस ठाण्यात बुधवारी (ता.२४) सायंकाळी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विनोद साहेबराव घाटविसावे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदरील आरोपीस  अंभोरा पोलीसानी बुधवारी (ता.२४) अटक करून गुरुवारी (ता.२५) न्यायालयात हजर केले असता आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे हे करित आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT