crime news 
मराठवाडा

खर्चासाठी पैसे दिले नाही म्हणून पुतण्याने केला चुलत्याचा खून

संजय रानभरे

घाटनांदूर (जि.बीड) :  खर्चासाठी चुलत्याने पैसे नाही दिल्याचा मनात राग धरून भर रस्त्यावर पुतण्याने चुलत्याला संपविलं आहे. पुतण्याने चुलत्यावर तीक्ष्ण हत्याराने डोक्यात हातावर व शरीराच्या इतर भागावर सापसप गंभीर वार केल्याने चुलता ठार झाल्याची घटना (ता.4) सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान येथे घडली आहे.

येथील जनार्धन मुंजा धोंगडे(चपला बुटाचा आठवडी बाजारात विक्रीचा व्यवसाय) (वय५५) यांना चुलत पुतण्या अर्जुन दत्तात्रय धोंगडे (वय२८) याने (ता.३) रविवारी खर्चीण्यासाठी उसने पैसे मागितले होते. चुलते जनार्धन धोंगडे यांनी पैसे देण्यास नकार दिला. पैसे देण्यास नकार दिल्याने पुतण्या अर्जुन धोंगडे यांच्या मनात राग बसला होता.

सोमवारी परळीचा आठवडी बाजार करून  घाटनांदूर येथील संत रोहिदासनगर येथील घराकडे जनार्धन धोंगडे जात होते. त्यावेळेस त्यांच्या पाळतीवर असलेल्या चुलत पुतण्या अर्जुन दत्तात्रय धोंगडे याने अचानक कुकरीसारख्या तीक्ष्ण हत्याराने डोक्यात, हातावर व शरीराच्या इतर भागावर सपासप वार करून भररस्त्यात चुलत्यास गंभीररित्या जखमी केलं. 

जनार्धन धोंगडे यांना अंबाजोगाईच्या ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर त्याच्या मृत्यू झाला. फरार होत असलेल्या आरोपीस पोलीस कॉनिस्टबल अनिल बिकड यांनी ताब्यात घेतले असून अंबाजोगाई पोलिस उपाधीक्षक सुनील जायभाये, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महादेव राऊत यांनी रात्री उशिरा दहा वाजता घटना स्थळाची पाहणी केली आहे.

रात्री बाराच्या दरम्यान मयताची मुलगी वैशाली भ्र. बापूराव वाघमारे हिच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्रीनिवास सावंत करत आहेत.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उकाडा वाढणार; मार्च उष्ण ते अतिउष्ण राहण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : राज्यात विविध कार्यक्रमांसह आज मराठी भाषा गौरव दिन साजरा होणार

Afghanistan–Pakistan War: अफगाण-पाक संघर्षाने घेतलं भीषण रूप! 15 चौक्या ताब्यात, 55 सैनिक ठार, सीमेवर रक्तरंजित संग्राम…

बंगळुरुतून जगभरात वाढवतायत 'ओळख मायबोलीची', देशविदेशातील हजारो विद्यार्थी शिकत आहेत मराठी

Rinku Singh Father Passed Away : क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT