Beed District Cooperative Bank News
Beed District Cooperative Bank News 
मराठवाडा

बीड जिल्हा बँक निवडणुकीत ट्विस्ट, सोसायटी मतदारसंघातील सर्वच अर्ज बाद

दत्ता देशमुख

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालक मंडळाच्या होऊ घातलेल्यानिवडणुकीत मोठे ट्विस्ट निर्माण झाले आहे. मंगळवारी (ता.२३) उमेदवारी अर्जांच्या छानणीत सेवा सोसायटीच्या सर्व ११ मतदारसंघातून दाखल झालेले सर्वच ८७ उमेदवारी अर्ज बाद ठरले आहेत. उमेदवाराच्या नावच्या ठराव देणाऱ्या संबंधित सेवा सोसायटीला लेखा परिक्षणात सलग तीन वर्षे अ किंवा ब दर्जा असावा. तसेच उमेदवाराला सदर सेवा सोसायटीचा प्रशासकीय अनुभव असावा अशी बॅंकेच्या अधिनयमात तरतुद आहे.

या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकही उमेदवाराच्या सेवा सोसायटीला अ किंवा ब दर्जा नसल्याने मंगळवारी छानणीत निवडणुक निर्णय अधिकारी विजय देशमुख यांनी सर्वच उमेदवारी अर्ज बाद केले. त्यामुळे निवडणुकीत मोठा पेच आणि ट्विस्ट निर्माण झाले आहे. दरम्यान, या मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते रमेशराव आडसकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, ऋषीकेश आडसकर, आमदार सुरेश धसांचे चिरंजीव जयदत्त धस, दाजीसाहेब लोमटे, अभय मुंडे, दत्तात्रय पाटील, फुलचंद मुंडे, महेंद्र गर्जे, अशोक लोढा, वसंत सानप, चंद्रकला वनवे, सतीश शिंदे, सत्यभामा बांगर, मधुकर काचगुंडे अशा मातब्बरांचे उमेदवारी अर्ज होते.

सदर सर्वच सोसायटच्या क दर्जाच्या असल्याने अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीत नवाच पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, सोमवारी (ता.२२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २१४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ता.१० मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी  क्लिक करा


१२ मार्चला चिन्हांचे वाटप व ता. २० मार्चला मतदान आणि २१ मार्चला मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार असल्याची माहिती सहायक निवडणुक निर्णय अधिकारी गोपाळकृष्ण परदेशी यांनी दिली.दरम्यान, जिल्ह्यातील ७३५ पैकी केवळ १३ सेवा सोसायटींना लेखा परीक्षणात अ किंवा ब दर्जा आहे. मात्र, नेमक्या याच संस्थांमधून कोणाचेही अर्ज नसल्याने ते बाद ठरले. मात्र, बँकेचा सदर अधिनियमास स्थगिती देण्याबाबत सहकार मंत्र्यांकडे सादर केलेल्या याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही. आता हा पेच कसा सुटणार याकडे सहकार तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT