Aurangabad News 
मराठवाडा

Coronavirus :बीड जिल्ह्यातील आणखी एका कोरोनाबाधीत महिलेचा औरंगाबादेत मृत्यू

प्रा. प्रविण फुटके

परळी वैजनाथ (बीड) : परळी येथील साठ वर्षीय महिलेचा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी (ता.१८) सकाळी मृत्यू झाला. महिलेचा स्वॅब पॉझिटीव्ह आला. दरम्यान, बीड जिल्ह्यात आता कोरोनाबळींची संख्या चार झाली असून यातील एक महिला नगर जिल्ह्यातील आहे. 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.
या महिलेसह बीड जिल्ह्यात आतापर्यंत ९७ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. त्यातील ६८ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. यापूर्वी दोघांचा बीडच्या जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला होता. त्यातील एक महिला नगर जिल्ह्यातील होती. तर
माळेगाव (ता. केज) येथील साठ वर्षीय महिलेचा मंगळवारी (ता.१६) मृत्यू झाला होता.

त्यानंतर गुरुवारी (ता.१८) सकाळी येथील ५७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या महिलेवर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात किडणीच्या आजारावर उपचार करण्यात येत होते. या महिलेला किडणीच्या आजाराबरोबर मधुमेह ही होता. पाच जून रोजी या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. दरम्यान, या महिलेसह आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९७ झाला. यातील ६८ कोरोनामुक्त तर चार मृत्यू झाले. २६ जणांवर बीड जिल्ह्यासह मुंबई, पुणे व औरंगाबादेत उपचार सुरु आहेत. 

चौथा बळी; जिल्ह्यातील तिसरा
नगर जिल्ह्यातील एक कुटूंब मुंबईहून नातेवाईकांकडे आष्टी तालुक्यात आले. या कुटूंबातील सात व्यक्तींना कोरोनाची बाधा आढळली. त्यातील एका महिलेचा ता. १७ मे रोजी मृत्यू झाला होता. तर, मातकुळी (ता. आष्टी) येथील तरुणाला विलगीकरण कक्षात दाखल केल्यानंतर त्याचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. तत्पुर्वी घेतलेल्या त्याच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. मंगळवारी (ता.१६) औरंगाबाद मध्ये माळेगाव येथील महिलेचा मृत्यू झाला. तर आता औरंगाबाद मध्येच परळीतील महिलेचा मृत्यू झाला आहे. हा जिल्ह्याच्या यादीतील चौथा आणि जिल्ह्यातील तिसरा कोरोनाबळी आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : झोजी ला खिंडीत जोरदार हिमवृष्टी

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Chhtrapati Sambhajinagar: वादळी पावसामुळे शहर अंधारात; ३०० महावितरण कर्मचारी रात्रभर दुरुस्तीवर

SCROLL FOR NEXT