In Beed district a farmer has committed suicide due to non receipt of grant from Pokra scheme.jpg
In Beed district a farmer has committed suicide due to non receipt of grant from Pokra scheme.jpg 
मराठवाडा

‘मायबाप सरकार मी आत्महत्या करत आहे’; पोकरा योजनेतील अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

दत्ता देशमुख

बीड : दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा यातून मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्याची नोंद असलेल्या बीड जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १८) पुन्हा एका शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली. मात्र, या शेतकऱ्याच्या मृत्यूला शासकीय योजना व कार्यालयातील दफ्तरदिरंगाई कारणीभूत असल्याचे त्याने लिहलेल्या मृत्यूपूर्व चिठ्ठीतून स्पष्ट होत आहे. शासकीय येाजनांतील त्रुटी आणि शासकीय कार्यालयातील दफ्तरदिरंगाईचा पंधरवाड्यातील हा दुसरा बळी आहे.

हे ही वाचा : घनसावंगी : कुणालाही न सांगता घरातून निघून गेलेल्या युवकाचा मृतदेह चौथ्या दिवशी आढळला
 
बाळासाहेब ज्ञानोबा मस्के (वय ४२) असे या शेतकऱ्याचे नाव असून सदर शेतकरी राक्षसभुवन (ता. गेवराई) येथील रहिवाशी आहे. 'मायबाप सरकार मी आत्महत्या करीत आहे, मी एक शेतकरी असून शेती परवडत नसल्याने मी जीवनयात्रा संपवित आहे. ‘पोकरा योजनेतून पॉवर विडर खरेदी केले, त्याचे अनुदान मिळाले नाही, तसेच शेततळे अस्तरीकरण केल्याचेही अनुदान मिळाले नाही, गोड्या पाण्यातील मत्सपालन केल्याचेही अनुदान मिळाले नसल्याने आपण कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत या मृत्यूपूर्व चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे. माझ्या दोन मुलांचा सांभाळ करा, असे आवाहन या चिठ्ठीतून त्यांनी आपल्या भावांना  व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, कधी अतिवृष्टी, कधी कोरडा दुष्काळ यामुळे नापिकीतून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरुच आहे. या वर्षभरात साधारण १६५ शेतकरी आत्महत्यांची जिल्ह्यात नोंद आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान वेळेत मिळत नाही, विमा कंपन्या नफेखोरी करुन शेतकऱ्यांची आबळ करतात, हाती काही पिकलेले विकण्यासाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्र वेळेत सुरु होत नाहीत, अशा आस्मानी आणि सुलतानी संकटात अडकलेला शेतकऱ्यांना जीवनयात्रा संपविण्याशिवाय पर्याय राहत नाही.

शासकीय कार्यालयातील दफ्तरदिरंगाई आणि योजनांतील त्रुटी शेतकऱ्यांच्या जिवावर उठत असल्याचे दिसत आहे. पंधरवाड्यापूर्वीच बिंदुसरा प्रकल्पासाठी संपदीत जमिनीच्या क्षेत्रातील दुरुस्तीसाठी १५ वर्षांपासून खेटे मारुनही न्याय मिळत नसल्याने अर्जुन साळुंके (रा. पाली, ता. बीड) या शेतकऱ्याने पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. आताही आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याने लिहिलेल्या मृत्यूपूर्व चिठ्ठीत शासकीय कार्यालयातील दफ्तरदिरंगाई व योजनांतील त्रुटीचा या घटनेला कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसते असे म्हटलं आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT