मराठवाडा

अॅडीशलनला चक्कर, उपचारा दरम्यान जिल्हाधिकारीही तळ ठोकून

दत्ता देशमुख

अलीकडे जिल्ह्यात देवस्थानच्या जमिनी बनावट आदेशांच्या आधारे खासगी लोकांनी बळकावण्याचे प्रकार समोर आले. याच्या सुनावण्या आणि शासनाकडे झालेल्या तक्रारींची माहिती गोळा करण्याचे कामही त्यांच्याकडेच आहे.

बीड : कामाच्या दगदगीने सुनावणी सुरु असतानाच अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे Additional Collector Tushar Thombare कार्यालयातच चक्कर येऊन पडले. त्यांच्यावरील उपचार काळात जिल्हाधिकारी रविंद्र जगतापही Collector Ravindra Jagtap पूर्णवेळ थांबून होते. बुधवारी (ता.२३) दुपारनंतर ही घटना घडली. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गावरील उपाय योजना आणि महसूलची नियमित कामे असा दुहेरी ताण सध्या महसूल यंत्रणेवर आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा दुर करण्यासाठी महसूल विभागाने केलेल्या प्लॅनिंग आणि प्रत्यक्ष कामात अपर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, अलीकडे जिल्ह्यात Beed देवस्थानच्या जमिनी बनावट आदेशांच्या आधारे खासगी लोकांनी बळकावण्याचे प्रकार समोर आले. याच्या सुनावण्या आणि शासनाकडे झालेल्या तक्रारींची माहिती गोळा करण्याचे कामही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे यासह इतर कामांसाठी उशिरापर्यंत श्री. ठोंबरे कार्यालयात थांबून असतात. मागच्या काही दिवसांपासूनच्या दगदगीमुळे बुधवारी कार्यालयातच सुनावणी सुरु असताना त्यांना अचानक चक्कर आली. कार्यालयातील सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी भूसाधार जिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांना माहिती मिळताच त्यांनीही रुग्णालयात धाव घेतली आणि श्री.जगताप यांना माहिती दिली. श्री. जगताप यांच्यासमोरही सुनावण्या सुरु होत्या. पण, याची माहिती मिळताच काम थांबवून जिल्हाधिकारी जगताप व निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटेही जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.beed news additional collector fallen, collector stay during treatment on him

दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्याकडून त्यांनी उपचाराची आणि श्री. ठोंबरे यांच्या तब्येची माहिती घेतली. श्री. ठोंबरे यांच्यावर डॉ. रेवडकर व डॉ. कोटेचा यांनी उपचार केले. त्यांच्या तपासण्यांचे सर्व अहवाल चांगले आले. पुढे इतर तपासण्यांसाठी त्यांना खासगी दवाखान्यात नेल्यानंतरही श्री. जगताप व श्री. सुकटे खासगी दवाखान्यातही पोचले. प्रकृती उत्तम असून केवळ दगदगीमुळे असे झाल्याचे डॉक्टरांनी सांगून आराम घेण्याचा सल्ला दिला. या निमित्ताने अधिकाऱ्यांमधील संवेदनशीलतेचीही प्रचिती आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT