shiv sena sakal
मराठवाडा

गुटखा प्रकरणामुळे कुंडलिक खांडेंचे शिवसेना जिल्हाप्रमुखपद गेले

बीड जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कमी होत असतानाच पक्षाअंतर्गत बंडाळी आणि गटबाजीने चांगलेच डोके वर काढले आहे.

दत्ता देशमुख

बीड : गुटखा प्रकरणात नाव येऊन गुन्हा नोंद झाल्याचे शिवसेनेचे (Shiv Sena) जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे (Kundalik Khande) यांच्या पदाला पक्षाने स्थगिती दिली आहे. मात्र, याचवेळी पक्षाने नवे नाव न जाहीर केल्याने इच्छुकही ‘सलाईन’वर गेले आहेत. अलीकडे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कमी होत असतानाच पक्षांतर्गत बंडाळी आणि गटबाजीने चांगलेच डोके वर काढले आहे. काही महिन्यांपूर्वी अप्पासाहेब जाधव यांच्या जिल्हाप्रमुखपदावरील निवडीनंतर पक्षातीलच पदाधिकाऱ्याने विरोध गेल्याने भर रस्त्यात हाणामारीची घटना घडली. त्यानंतर या पदाधिकाऱ्याने थेट जाधव यांची निवड रद्द करावी अन्यथा आपण शिवतीर्थावर जिव देऊ अशी भूमिका घेतली. पक्षातील बड्या नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण निपटते न निपटते तोच बीडमध्ये मंत्री संदीपान भूमरे यांच्या उपस्थितीत संघटनेतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी जिल्हाप्रमुख स्वत:च्या व्यवसायात मग्न आहेत, त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आंदोलनाला वेळ नाही. पाठबळ (Beed) मिळत नाही, असे गंभीर आरोप केले.

यानंतर आरोप करणाऱ्यांपैकी एका उपजिल्हा प्रमुखावर जिवघेणा हल्लाही झाला. हल्ल्यातील आरोपींपैकी एक पक्षातीलच निघाला. यामुळे पक्षांतर्गत नाराजी आणि गटबाजी चांगलीच चव्हाट्यावर आली. याच काळात शिवसेनेतील एक गट जिल्हाप्रमुख बदलासाठी मुंबईत तळ ठोकून होता. मात्र, पक्षाने जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर मेहरबानी कायम ठेवली. मात्र, गेल्या आठवड्यात सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने गुटख्यांच्या गोदामांवर छापे टाकले. यातील एक आरोपी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव पोलिस दफ्तरी नोंदले गेले. त्यानंतर अखेर पक्षाने सोमवारी (ता. २२) खांडे यांच्या पदाला स्थगिती दिल्याचे जाहीर केले. मात्र, याच वेळी इच्छुकांची अर्धा डझन संख्या असताना पक्षाने नवीन जिल्हाप्रमुखाचे नाव का, जाहीर केले नाही, असा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock : 'या' एका स्टॉकने गुंतवणूकदारांची केली चांदी! तुमची १ लाखाची गुंतवणूक आज झाली असती ६४ लाख रुपये...

Latest Marathi News Live Update : पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थी मॅरेथॉन बैठका

Video : अर्जुन स्वतःच्या जीवाशी खेळून महिपतला पोलिसांच्या हवाली करणार ! नव्या ट्विस्टने प्रेक्षकही चकित

Mumbai Election : भाजपमधून  26  बंडखोरांची हकालपट्टी; मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची कारवाई, सहा वर्षांसाठी पक्षातून केलं निलंबन

Whatsapp : पालकांसाठी खुशखबर! व्हॉट्सअ‍ॅपची लपवा-छपवी संपणार; तुमची मुलं काय करतात, कुणाशी बोलतात सगळं कळणार, नवीन फीचर काय आहे पाहा

SCROLL FOR NEXT