budget dhanajay munde
budget dhanajay munde 
मराठवाडा

Maharashtra Budget 2021: बीडच्या राजकारणात धनंजय मुंडेंचा मास्टरस्ट्रोक? अर्थसंकल्पात बीड जिल्ह्यात मोठी तरतूद

सकाळ ऑनलाईन टीम

बीड: बीड जिल्ह्यातील अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर राज्याच्या अर्थसंकल्पात निधी मिळवून मंत्री धनंयज मुंडे यांनी मास्टरस्ट्रोक खेळल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. कारण या अर्थसंकल्पात बीडकरांचं लक्ष लागून असलेला नगर-बीड-परळी मार्ग आणि जिल्ह्यातील प्रमुख आध्यात्मिक श्रध्दास्थानांना निधी मिळाला आहे. हा मुंडे यांचा मोठा मास्टरस्ट्रोक असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगत आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात बीडमधील परळी वैजनाथचं प्रभू वैद्यनाथचं मंदिर, श्रीक्षेत्र भगवानगड, श्रीक्षेत्र नारायणगड, श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड, आणि पुरुषोत्तम पुरी येथील पुरुषोत्तम मंदिरासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे. 

तसेच जिल्ह्यातील पायाभूत सुविधेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम प्रगती पथावर असून ते लवकरच पूर्ण होईल असंही सांगितलं. याचबरोबर जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांवर भरीव तरतूद केल्याने तिथल्या विकासासाठी त्याचा फायदा होणार आहे. 

ज्या आध्यात्मिक स्थानांच्या विकासासाठी सरकारने निधी मंजूर केला आहे त्यांच्याशी मोठा भक्तवर्ग जोडला आहे. तसेच बीडमधील राजकारण सत्ता परिवर्तनाचे केंद्रं म्हणून या क्षेत्रांकडे पाहिलं जातं. हीच बाब पकडत पालकमंत्री धनंयज मुंडेंनी या आध्यात्मिक क्षेत्रांना मोठा निधी मिळवून दिला आहे. याचा फायदा मुंडेंच्या भविष्यातील राजकारणाला कितपत होईल हे 
आता येणारा काळंच ठरवेल.

तसेच ऊसतोड मजूंरासंबंधीही एक निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला. ऊसतोड मजुरांसाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर महामंडळाला आर्थिक निधी देण्यासंदर्भात घोषणा केल्याने ऊसतोड मजुरांमधून देखील आनंद व्यक्त केला जात आहे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT