Nanded Photo 
मराठवाडा

खबरदार...बँकांनी निर्देश पाळले नाही तर होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : प्रधानमंत्री जनधन योजनेतील महिला खातेदारांच्‍या खात्‍यात जमा करण्‍यात आलेली रक्‍कम खात्‍यामधून वाटप करतांना बॅंक व बॅंक ग्राहक सेवा केंद्रात नागरीकांची गर्दी टाळण्‍यासाठी दिलेल्या कार्यप्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी दिले आहे.

अशा आहेत सूचना
शुक्रवारी (ता.तीन एप्रिल २०२०) ज्‍यांच्‍या खाते क्रमांकाचा शेवट शून्‍य (0) किंवा एक ने होतो अशांना सदर रक्‍कम काढता येईल. शनिवारी (ता.चार) ज्‍यांच्‍या खाते क्रमांकाचा शेवट दोन किंवा तीनने होतो अशांना सदर रक्‍कम काढता येईल. रविवार (ता.पाच) व सोमवारी (ता.सहा) महावीर जयंतीची सुट्टी. मंगळवारी (ता.सात) ज्‍यांच्‍या खाते क्रमांकाचा शेवट चार किंवा पाचने होतो अशांना सदर रक्‍कम काढता येईल. बुधवारी (ता.आठ) ज्‍यांच्‍या खाते क्रमांकाचा शेवट सहा किंवा सातने होतो अशांना सदर रक्‍कम काढता येईल. गुरुवारी (ता.नऊ) ज्‍यांच्‍या खाते क्रमांकाचा शेवट आठ किंवा नऊने होतो अशांना सदर रक्‍कम काढता येईल.

मनरेगा अंतर्गत व प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी अनुदान प्राप्‍त

ज्‍यांना या कालावधीत पैसे काढता आली नाहीत, अशा महिला खातेदारांना नऊ एप्रिल २०२० नंतर त्‍यांना कधीही त्‍यांच्‍या खात्‍यातून पैसे काढता येणार. वरील वेळापत्रकाबाबत सर्व संबंधित बॅंकानी लाभधारकांना, ग्राहकांना विहित केलेला मजकुर एसएमएस पाठवून अवगत करावे.  त्‍याचप्रमाणे मनरेगा अंतर्गत व प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी अंतर्गत येणारे अनुदानाच्‍या बाबतीत वेळोवेळी शासनाकडून प्राप्‍त होणाऱ्या निर्देशानुसार कळविण्‍यात येईल, असेही निर्देशामध्ये म्हटले आहे.

निर्देश काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक

सर्व बॅंका त्‍यांच्‍या नियमित वेळेनुसार चालू राहतील. जिल्‍हयातील बॅंकाअंतर्गत सुरु असलेले सर्व ग्राहक सेवा केंद्र सकाळी सात ते रात्री नऊ या कालावधीत कमीतकमी आठ तास चालू राहतील, याची खातरजमा संबंधित नियंत्रण अधिकारी यांनी करावयाची आहे. सर्व बॅंक व्‍यवस्‍थापकांनी, ग्राहक सेवा केंद्र चालकांनी कोव्‍हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी उपाययोजनाच्‍या अनुषंगाने Social Distancing व दिलेले इतर निर्देश यांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. 
 

उल्‍लंघन करणाऱ्या व्‍यक्‍ती, समूह यांच्याविरुध्‍द  कार्यवाही
पुढील आदेश येईपर्यंत सर्वच बॅंकांनी याचे काटेकोर अमलबजावणी करावयाची आहे. यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निर्देश, परिपत्रके या आदेशासह अंमलात राहतील. या आदेशाचे उल्‍लंघन करणाऱ्या कोणत्‍याही व्‍यक्‍ती, समूह यांच्याविरुध्‍द आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम २००५ अन्‍वये व भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कार्यवाही करण्‍यात येईल.
- डॉ. विपीन इटनकर (जिल्हदंडाधिकारी,नांदेड) खब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Verdict : माधुरी हत्तीचं पुढं काय झालं? अनेकांना प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

‘रंगीला’पुन्हा पडद्यावर! उर्मिला-अमिरचा क्लासिक लव्हस्टोरी परत अनुभवता येणार, 'या' दिवशी रीरिलीज होणार सिनेमा

Guardian Minister Chandrakant Patil: महायुतीचा महापौर होण्यासाठी परिश्रम घ्यावेत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील; आगामी काळात जबाबदाऱ्या मिळतील

Beed Nandanvan Hostel: नंदनवन नव्हे छळछावणी! वसतिगृहात लहानग्यांना धुवायला लावले कपडे | Beed | Sakal News

Birthday Special: बाबो! ललित प्रभाकर आजही व्हॉस्टअ‍ॅप वापरत नाही! ऋता दुर्गुळेनं केला खुलासा... म्हणाली, 'आम्ही बोलताना...'

SCROLL FOR NEXT