bird flu 
मराठवाडा

बर्ड फ्लूची भीती; कोंबड्या, अंड्यांची मागणी घटली

राम काळगे

निलंगा (जि.लातूर)  : पाच राज्यांमध्ये बर्ड फ्लूची साथ आली. त्याचा परिणाम स्थानिक कुक्कुटपालन व्यवसायावर झाला आहे. यामुळे कोंबडी, अंडी यांची मागणी घटली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत खवय्या असलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

कुक्कुटपालन व्यावसायिकांकडून गावातील पॅनेल प्रमुखांना फोनकॉल करून कोंबडीच्या दराचे काहीतरी होईल तुम्ही फक्त मागणी नोंदवा अशी विनंती केली जात आहे. तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना पार्ट्यांचे नियोजन केलेले होते. पण, आता बर्ड फ्लूमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मटणाची पार्टी नको रे बाबा असे कार्यकर्ते म्हणत आहेत.

एकप्रकारे ही साथ उमेदवारांच्या पथ्यावरच पडली आहे. यामुळे त्यांच्या खर्चात कपात होणार आहे. सध्या शहरासह ग्रामीण भागात बर्ड फ्लूची भीती आहे. बाजारातील कोंबड्याचे दर गडगडले आहेत. त्यातच ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांना खूश करण्यासाठी देण्यात येणाऱ्या कोंबडा पार्टीत पोल्ट्री व्यापाऱ्याकडून फक्त तुम्ही कॉन्टिटी कळवा आम्ही घरपोच कोंबड्या पाठवतो, असे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AFG A, ODI: भारतीय अ संघाचा उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा! १०१ धावांनी विजयासह ठोकली फायनलसाठी दावेदारी, समीकरण घ्या जाणून

Mumbai News: ४५ मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत! मुंबईत नवा उड्डाणपूल खुलणार, कुठे आणि कधीपासून?

हिंदी मालिकेत रोमान्सच्या नावाखाली मारहाण; प्रेक्षक संतापले; मराठीत बनलाय त्याच मालिकेचा रिमेक, इथेही तेच दाखवणार?

Bandhavgad Tiger: वाघ पाहायचाय? मग बांधवगडला नक्की जा! २००० वर्षांचा किल्ला, जंगल सफारी आणि आता राष्ट्रीय पुरस्काराचीही शान

Donald Trump Iran Warning: ''इराणसोबत सामंजस्य करार नाहीच, ते फक्त एक पत्र...'', पुन्हा हल्ले करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT