Bondali does huge damage to crop
Bondali does huge damage to crop 
मराठवाडा

बोंडअळीचा ठिय्या, कपीशी गेली वाया

प्रकाश ढमाले

पिंपळगाव रेणुकाईः परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनाकांच्या कपीशीच्या पिकाला फटका बसला, किमान फरदड कपाशीपासून उत्पन्न मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी दिवसरात्र कष्ट करीत पिके जपली; मात्र परिसरात सध्या बोंडअळीने कपाशीवर ठिय्या मांडला आहे. परिणामी पिकेही वाया गेली आहेत. काही जणांनी तर पिकातच जनावरे चरण्यासाठी सोडल्याचे चित्र दिसत होते. 

यावर्षी परिसरात पाऊस चांगला असल्याने दुष्काळातून मुक्ती मिलण्याचे संकेत जाणवले; मात्र घसरलेले भाव व सतत पिकांवर पडणारी रोगराई, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. आता तर बोंडाअळीने कहरच केला असून वर्षभर सांभाळलेल्या कपाशीला उपटून फेरण्याची, जनावरांना चारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ‘बोंजअळीचा ठिय्या कपाशी गेली’ वाय अशी स्थिती झाली आहे. 

सतत वर्षानुवर्षांपासून शेतकऱ्यांच्या मस्तकी दुष्काळी परिस्थीती ओढावत आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन बसला आहे; मात्र यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे चांगले संकेत दिल्याने नगदी पैसे देणारे पीक म्हणून यावर्षी कपाशीचा पेरा वाढला होता. किमान या येणाऱ्या पैसातून कर्जबाजारीपणातून मुक्ती मिळेल, अशा आशा शेतकऱ्यांमध्ये होत्या;  मात्र आता त्या कपाशीलाही भाव नसल्याने सर्व आशांवर पाणी फेरले गेले. दोन वेचणींत कापूस संपला. ठिबकवर केलेल्या कपाशीची परिस्थीता जेमतेम होती; मात्र त्यालाही बोंडअळीचे ग्रहन लागले. अतिवृष्टीने खरिपाची पिके हातची गेली. जणू सर्वत्र शेतकऱ्यांच्या खरिपालाचा ग्रहन लागल्यासारखे झाले.

चोरीला गेलेल्या गाड्या सहसा कधीच सापडत नाहीत, पण लातुरात मात्र...
 
रब्बी पिके आता बऱ्यापैकी डौलात असली तरी ढगाळ वातावरण धुके यामुळे रब्बी पिकेही धोक्यात आले. तेलही गेले आणि तूपही अशी परिस्थीती शेतकऱ्यांवर येण्याची शक्याता आहे. सध्या कपाशी उपटून गहू लागवड केली जात आहे, तर काही शेतांत कपाशीत जनावरे सोडली जात आहेत.  

कृषी खात्याचे दुर्लक्ष

शेतकऱ्यांवर सतत संकटावर संकट येत असतानाही कृषी खात्याला मात्र कुठलेही सोयरसुतक नाही. संकटावर मात केली जावी यासाठी कुठलेही मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी शासनाने नियुक्ती केलेले कृषी सहायक गावकडे कधी फिरकताना दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. कृषी सहायकांनी येऊन शेतकऱ्य़ांना मार्गदर्शन केले असते तर बोंजअळीवरही मात करता आली असती, असे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitesh Sharma PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं पुन्हा कर्णधार बदलला; जितेश शर्मा हंगामच्या शेवटच्या सामन्यात करणार नेतृत्व

Buldhana Latest News : मोठा अनर्थ टळला! चारधाम यात्रेसाठी निघालेले बुलडाण्याती ३० प्रवासी थोडक्यात बचावले

Priyanka Gandhi : ''माझ्या आजीला, वडिलांना तुम्ही देशद्रोही म्हणणार, मग...'' प्रियांका गांधींचा भाजपवर हल्ला

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT