file photo 
मराठवाडा

ब्रेंकिंग ः हिंगोलीत पुन्हा चार एसआरपीएफचे जवान पॉझीटीव्ह   

राजेश दारव्हेकर

हिंगोली : एसआरपीएफचे जवान मुंबई व मालेगाव येथून बंदोबस्‍तावरून परतलेल्या १९२ जवानाना क्‍वारंटाईन करण्यात आले होते. त्‍या सर्वाचे स्‍वॅब नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविले. त्‍यापैकी सहा जवानांना कोरोनाची लागन झाल्याचे स्‍पष्‍ट झाले होते. दरम्यान, सोमवारी  (ता.२७ एप्रिल २०२०) पुन्हा चार जवानांना कोरोनाची लागन झाल्याने आता पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या १ झाली आहे, अशी माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.

मुंबई, मालेगाव येथील बंदोबस्तावरून परतलेल्या क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलेल्या चार एसआरपीएफच्या जवानांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तसा अहवाल औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी प्राप्त झाला आहे. चार जवानांना कोरोनाची लागण झाल्याने आता रुग्ण संख्येत वाढ होऊन अकारावर पोहचल्याने जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.

मागील आठवड्यात मालेगाव, मुंबई येथून १९२ जवान कर्तव्य बजावून हिंगोलीत परतले होते. याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना मिळताच त्यांनी तातडीने एसआरपीएफमधील रुग्णालयात सर्व जवानांना क्‍वारंटाइन केले होते. त्यांच्या आरोग्याची तपासणी करून स्वॅब नमुने औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आले होते. यातील १९४ जवानांपैकी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली.

मात्र पॉझिटिव्ह निघालेल्या व सोबतच्या जवानांवर उपचार करून क्‍वारंटाईन करता न करताच तोच पुन्हा जालना येथून हिंगोलीत दाखल झालेल्या हिवराबेल येथील एका जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा सातवर गेला.  त्यांच्या संपर्कातील चार जवानांचा अहवाल पुन्हा पॉझिटीव्ह आल्याने आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या अकारावर पोहचली आहे. 

एका जवानाला शुक्रवारी (ता.२४ एप्रिल) आयसोलेशन वॉर्डात भरती करून उपचार सुरु होते. त्यानंतर या चार जवानांचे थ्रोट स्वॅब अहवाल शनिवारी (ता.२५ एप्रिल २०२०) घेण्यात आले. त्यांचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला असून चार जवान पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. या सर्वांची प्रकृती स्थिर असून कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नसल्याचे त्यांनी सांगितले. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात कोरोना बाधित दहा जवान आणि जालना येथील एक असे एकूण अकरा कोरोना बाधितांची संख्या झाली आहे.

प्रशासनाने कोरोना बाधित जवानाच्या संपर्कात आलेल्या ४६ जणांनाही रुग्णालयात क्वारंटाइन केले आहे. जिल्ह्यात आढळलेला पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतला असतानाच पुन्हा सात जवान कोरोना बाधित आढळले. आता त्यात आणखी चार जवानांची भर पडली असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अकारावर पोहचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपुरात मुसळधार! शाळा पाण्यात, रस्त्याचं काम वेळेत पूर्ण न झाल्याचा फटका; पाणीच पाणी

Mumbai Local: मुंबई लोकलला प्रवाशांमुळे उशीर, रेल्वे प्रशासनाचा दावा; नेमकं प्रकरण काय?

Thane Crime: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, शाळेसमोरच सुरू होता प्रकार; ५ तरुणींची सुटका; दोघांना अटक

फाळणीची जखम आणि आशेचा किरण! प्रीती झिंटा अन् सनी देओलच्या 'बटवारा १९४७' चित्रपटाची पहिली झलक

Latest Live Updates Marathi : मुसळधार पाऊस, नागपूर खंडपीठातील वकिलांच्या दालनासमोर साचलं पावसाचे पाणी

SCROLL FOR NEXT