Maruti-and-Kushabai
Maruti-and-Kushabai 
मराठवाडा

भावाच्या दुःखावेगाने बहिणीचेही निधन

सकाळवृत्तसेवा

उमरगा - हृदयविकाराच्या झटक्‍याने सख्ख्या भावाचा मृत्यू झाल्याचे दुःख असह्य झाल्याने बहिणीचाही हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. १४) कसगी (ता. उमरगा) येथे घडली. या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे मारुती शंकर गायकवाड (वय ६५) हे नेहमीप्रमाणे पहाटे पाचला उठले. बाहेरून पाणी आणले. थंडीमुळे थोडे अस्वस्थ वाटत असल्याचे पत्नीला सांगून ते झोपले. झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सकाळी सातच्या सुमारास त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. काही क्षणांतच त्यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह गावी नेण्यात आला. माहिती मिळताच कसगी गावातच राहणारी त्यांची सख्खी बहीण कुशाबाई शिवमूर्ती कांबळे (५५) यांनी मारुती यांच्या घरी धाव घेतली. तेथील प्रसंग पाहून त्या बेशुद्ध झाल्या. येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सकाळी अकराच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्‍याने कुशाबाई यांचाही मृत्यू झाला. 

मारुती गायकवाड यांच्या पार्थिवावर दुपारी दोनला अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. कुशाबाई कांबळे यांच्या पार्थिवावर गुरुवारी (ता. १५) सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्यामागे पती, तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तिन्ही मुले पुण्याला असतात.

गायनाचीही आवड
मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना मारुती गायकवाड हे लाकडी अवजारे साकारण्याचे काम करीत. भीमगीतांच्या कार्यक्रमांत ते सक्रिय सहभागी होत आणि उत्तम गीते सादर करीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT