Ambajogai Crime News 
मराठवाडा

थरार! काही कळण्यापूर्वीच भररस्त्यात तरुणावर धारदार शस्त्राने वार, उपचारापूर्वीच सोडला जीव

प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई (जि.बीड) : शहरातील यशवंतराव चव्हाण चौकाजवळील पाण्याची टाकी परिसरात सोमवारी (ता.एक) सायंकाळी साडेसातच्या सुमारास अज्ञातांनी एका युवकाचा धारदार शस्त्रांनी खून केल्याची घटना घडली. दरम्यान या घटनेचा रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.

गणेश सुंदरराव मोरे (वय 20) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मारेकरी खून करून फरार झाल्याने अद्याप खून कोणत्या कारणाने झाला. याचा तपास पोलिसांना लागला नव्हता. घटनेची माहिती अशी, की गणेश मोरे हा सायंकाळी पाण्याची टाकी परिसरात बसला होता. यावेळी मारेकरी अचानक तिथे आले आणि त्यांनी धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार करून निघून गेले.

त्यात गणेश गंभीर जखमी झाला. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतू त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिस आरोपींचा शोध घेत असल्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT