Crime
Crime 
मराठवाडा

पाच वर्षांच्या चिमुकलीला वाटी गरम करून चटके

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या पाच वर्षांच्या चिमुकलीला आई व तिच्या प्रियकराने गॅसवर वाटी गरम करून सर्वांगाला चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार मुकुंदवाडी भागात समोर आला आहे. जिवाच्या आकांताने रडणाऱ्या चिमुकलीला त्यानंतर नराधम प्रियकराने बेदम मारहाणही केली. यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीवर सध्या उपचार सुरू आहेत.  

राहुल रावसाहेब पवार (रा. राहुलनगर, कातपूर, ता. पैठण) असे संशयित प्रियकराचे नाव आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले, की पोरगाव (ता. पैठण) येथील सुमनबाई (नाव बदललेले आहे) ही पतीला अर्धांगवायूचा आजार झाल्यामुळे त्याला सोडून तिन्ही मुलांसह घर सोडून राहुल सोबत मुकुंदवाडीत राहते; मात्र तिची मुले अनैतिक संबंधात अडसर ठरत होती. मंगळवारी (ता.२३) राहुलने पाचवर्षीय चिमुकलीला बाहेर जाण्यास सांगितले; पण ती घरातच खेळत असल्याने राहुलने गॅसवर वाटी गरम करून तिच्या सर्वांगाला चटके दिले. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर तिच्या ओठाला जबर चावा घेतला. 

या प्रकारानंतरही तिला बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीला २३ एप्रिलला दवाखान्यात भरती करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने हा प्रकार सुमनबाईच्या भावाने तिच्या दिराला कळविला व औरंगाबादला आले. त्यांनी पुतणीची विचारपूस केली असता हा प्रकार समोर आला. या प्रकरणी चिमुकलीच्या चुलत्याच्या तक्रारीवरून विनयभंग, पोक्‍सो कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक मीरा चव्हाण करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT