वालसावंगी : हिरवी मिरची तोडणी करताना.  
मराठवाडा

कोरोना, कोकड्याच्या धाकात मिरचीची तोडणी

विशाल अस्वार

वालसावंगी (जि.जालना) - एकीकडे कोरोनाचा धाक, दुसरीकडे कोकडा नावाच्या रोगाचा मिरचीवरील प्रादुर्भाव. या साऱ्या गोंधळात अनेकांची मिरची सध्या तोडणीला आली आहे. त्यामुळे सकाळपासूनच मिरची तोडणीची लगबग सुरू आहे. सोबत परस्परांना बोलण्यासाठी कोरोना, कोकडा हा विषयही आहे. 

जालना जिल्ह्यातील वालसावंगी परिसर मिरचीचे नंदनवन म्हणून परिचित आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली आहे. त्यातच उन्हाळी लागवड असलेल्या झाडाला मिरच्या लगडल्या आहेत. परिणामी तोडणी सुरू झाली आहे.

तोडणीसाठी मजुरांची मदत घेण्यात येत असल्याने अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे. येणाऱ्या काही दिवसांत मिरची तोडणीला आणखी वेग येणार आहे. फक्त भाव समाधानकारक मिळावा, अशी अपेक्षा उत्पादक शेतकऱ्यांना आहे. 

मिरची लागवड केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या बहरलेल्या मिरची पिकांवर अचानकपणे कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे झाडाची पाने कोकडून गेली आहेत. अनेक महागडी औषध फवारणी करूनसुद्धा नियंत्रण होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. काहींनी तर झाडे उपटून टाकली आहेत. यामुळे उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. 

लागवड केलेली मिरची बहरात होती; मात्र अचानकपणे कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाला. निम्म्याहून अधिक झाडे कोकडाग्रस्त झाली. यामुळे मोठे नुकसान झाले. आता ती झाडे उपटून टाकण्यात येऊन त्या जागेवर दुसरे पीक लावण्यात येणार आहे. 
- विजय बेराड, शेतकरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT